Join us

बिल्डरधार्जिण्या धोरणास थारा नाही

By admin | Published: December 06, 2014 11:24 PM

शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी वाढीव एफएसआयचा अध्यादेश जानेवारी 2क्15 मध्ये निघेल.

नवी मुंबई : शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी वाढीव एफएसआयचा अध्यादेश जानेवारी 2क्15 मध्ये निघेल. पुनर्विकासामध्ये बिल्डरधार्जिण्या धोरणास थारा दिला जाणार नाही. सर्वसामान्यांना डोळ्यांसमोर ठेवून सरकार पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, अशी माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली. नवी मुंबईमधील मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यापूर्वी नेत्यांनी एफएसआयचा अध्यादेश निघाल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक केली होती. बिल्डरधार्जिणो धोरण मंजूर करून घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. परंतु विद्यमान सरकार सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेणार आहे. सिडकोने तयार केलेला जुन्या इमारतींना तीन एफएसआय देण्याचा व स्वत: पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव जनहिताचा आहे. यामध्ये रहिवाशांना दीडपट मोठे घर मिळणार आहे. उर्वरित जागेवर सर्वसामान्यांसाठी घरे बांधता येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शक्य तितक्या लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला आहे. जानेवारीत याविषयीचा अध्यादेश निघेल, असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. याविषयी येत्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली घरे नियमित करणो. गावठाणांना वाढीव एफएसआय देण्याविषयीही मुख्यमंत्र्यांकडील बैठकीत चर्चा झाली आहे. शहरातील अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत.  एखादी दुर्घटना होण्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात दोन कुस्तीकेंद्रे तयार करणो, पोलीस वसाहतींना वाढीव एफएसआय,  नेरूळ ते मांडवा जलवाहतूक आणि शहरात अत्याधुनिक ग्रंथालय उभारण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
गणोश नाईक भाजपामध्ये येणार असल्याविषयी मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही त्यांचा पराभव केल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये अपयश येण्याच्या भीतीमुळे त्यांची धडपड सुरू आहे.
 
पक्षात त्यांच्या येण्याविषयी चर्चा नाही. मी आतार्पयत त्यांच्याशी संघर्ष करत आले आहे. संघर्षाला मी घाबरत नाही. वेळ पडली तर यापुढेही संघर्ष सुरू राहील, असे म्हात्रे यांनी सांगितले. भाजपा कार्यकत्र्यानी या वेळी नाईकविरोधी घोषणाबाजी केली.
 
च्सीबीडी सेक्टर 15 मध्ये खाडीकिनारी माजी मंत्र्यांचे भाचे संतोष तांडेल यांनी ग्लास हाऊस बांधले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सिडकोने येथील अतिक्रमण हटविले आहे.
 
च्या ठिकाणी पुलाजवळ जेट्टी बांधण्यासाठी मेरीटाइम बोर्डाकडे व शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. ग्लास हाऊसच्या जागेवर नागरिकांसाठी उद्यान व योगा सेंटर तयार केले जाणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.