Join us

बिल्डरला भागीदारांकडून ३२ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 6:35 AM

एका बांधकाम व्यावसायिकाच्या बँक खात्यावरील रक्कम बनावट कागदपत्रांच्या आधारे भागीदारांसह एकाने बनवून त्यांची ३२ कोटी रुपयांची फसवणूक केली.

मुंबई : एका बांधकाम व्यावसायिकाच्या बँक खात्यावरील रक्कम बनावट कागदपत्रांच्या आधारे भागीदारांसह एकाने बनवून त्यांची ३२ कोटी रुपयांची फसवणूक केली.दोघा भागीदारांनी व भागीदाराच्या एका कर्मचाऱ्याने बांधकाम व्यावसायिकाच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर वर्ग करून तब्बल ३२ कोटी ६३ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार मुलुंड (पूर्व) परिसरात घडला. या प्रकरणी सुहेल मुबारक नुराणी (वय ५९) यांनी भागीदार संजीव मलिक उर्फ बाबा मलिक व राहुल आणि मलिक यांच्या एका कर्मचाºयाविरुद्ध नवघर पोलिसांत तक्रार केली आहे. तिघांनी जून २०१४ ते फेबु्रवारी २०१८ या कालावधीत ही फसवणूक केली आहे.नुराणी यांचा दोघा बिल्डरांसह भागीदारीत व्यवसाय होता. त्यांचे स्टेट बॅँक आॅफ इंडिया व आंध्रा बॅँकेत खाते होते. ठरावाची बनावट कागदपत्रे तयार करून तसेच यासंदर्भात नुराणी यांच्या कोºया चेकवर स्वाक्षºया घेऊन भागीदारांनी त्यांच्या खात्यातून एकूण ३२ कोटी ६३ लाख ११ हजार ९४१ रुपये काढून घेतले. तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.