Join us

बिल्डरला ईडीची बनावट नोटीस देऊन धाक; आरोपीला पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 6:49 AM

आरोपीला ठाणे न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : एका बड्या विकासकास ईडीची बनावट नोटीस दाखवून ६ कोटी ५५ लाखांच्या खंडणीप्रकरणी दाखल गुन्ह्यात काशिमीरा पोलिसांनी बुधवारी पहाटे राजू हमीरमल शाह या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला ठाणे न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

आनंद अग्रवाल, हरीश उर्फ मोंटू अग्रवाल या विकासकांना ईडीची बनावट नोटीस दाखवून ६ कोटी ५५ लाखांच्या खंडणीसाठी धमकवणाऱ्या इस्टेट एजंट गौतम अग्रवाल (अंधेरी), मितेश शाह (भाईंदर) व राजू हमीरमल शाह (भाईंदर) या तिघांविरुद्ध  काशिमीरा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होऊन दिल्लीतूनन बनावट ईडी नोटीस बनवणाऱ्या कृष्णकुमार ओमप्रकाश कौशिक  याला सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे यांच्या पथकाने अटक केली होती. दरम्यान, राजू शाह याचा अटकपूर्व जामीन ठाणे न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे पोलिसांनी शाह याला बुधवारी पहाटे अटक केली.

याचिकेवर ताशेरेराजू शाह याच्यावर भाईंदर पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल असून उच्च न्यायालयाने २०१७ साली शाहने दाखल केलेल्या एका जनहित याचिकेवर ताशेरे ओढत  त्याला १ लाखांचा दंड ठोठावला होता.  या बाबी न्यायालयासमोर मांडत शाह याची सात दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या गुन्ह्यातील ही दुसरी अटक आहे.

टॅग्स :मुंबईअंमलबजावणी संचालनालय