Join us  

तीन कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरला धमकी

By admin | Published: October 24, 2015 3:29 AM

तीन कोटींच्या खंडणीसाठी बदलापूरच्या बड्या बिल्डरला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी देणाऱ्या डी.के. राव टोळीतील हबीबा खान आणि विकी उर्फ विक्रांत जाधव

ठाणे : तीन कोटींच्या खंडणीसाठी बदलापूरच्या बड्या बिल्डरला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी देणाऱ्या डी.के. राव टोळीतील हबीबा खान आणि विकी उर्फ विक्रांत जाधव यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर युनिटने अटक केली. त्यांच्याकडून एका पिस्तुलासह दोन काडतुसेही हस्तगत करण्यात आली. बदलापूरच्या शिरगावात सापळा रचून त्यांना अटक केली. हबीबा ही डी.के.ची मानलेली बहीण असून, तिच्याकडेच या टोळीची सर्व सूत्रे आहेत. १५ जुलै २०१५ रोजी तिच्याच इशाऱ्यावरून बदलापूरच्या बिल्डरला खंडणीसाठी धमकावले होते. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुन्हे अन्वेषण शाखेच्या उल्हासनगर युनिटकडे तपास सोपविला होता. यात हबीबाचा थेट सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर विकीला १९ आॅक्टोबर रोजी अटक केली. तर, तिला चेंबूरच्या टिळकनगर भागातून ताब्यात घेतले. बिल्डरला धमकावल्या प्रकरणी आरोपींना २६ आॅक्टोबरपर्यंत कोठडी मिळाली आहे.कोण आहे डी.के.? गँगस्टर छोटा राजन याचा डी.के. राव हस्तक असून, त्याच्यावर खंडणीसाठी अपहरण, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे विविध स्वरूपाचे २२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे आदी परिसरात त्याच्या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया सुरू आहेत. तो खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.