कौशल्य विकासासाठी बांधकाम व्यावसायिकांनी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 03:29 AM2018-07-15T03:29:46+5:302018-07-15T03:29:50+5:30

वेगाने वाढणाऱ्या बांधकाम व्यवसायामध्ये कुशल कामगारांची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी देशभरातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या ‘क्रेडाइ’ने पुढाकार घेतला आहे.

Builders took initiative for skill development | कौशल्य विकासासाठी बांधकाम व्यावसायिकांनी घेतला पुढाकार

कौशल्य विकासासाठी बांधकाम व्यावसायिकांनी घेतला पुढाकार

Next

मुंबई : वेगाने वाढणाऱ्या बांधकाम व्यवसायामध्ये कुशल कामगारांची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी देशभरातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या ‘क्रेडाइ’ने पुढाकार घेतला आहे. राष्टÑीय कौशल्य विकास परिषदेच्या सहकार्याने क्रेडाइने २००७ सालापासून आजवर तब्बल १ लाख युवकांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. येत्या काही वर्षांत या कामाला आणखी गती दिली जाणार आहे.
१५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. रोजगारक्षम कौशल्याअभावी बेरोजगार राहिलेल्या युवकांना योग्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाची या दिवसानिमित्त उजळणी होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर क्रेडाइतर्फे माहिती देण्यात आली.
बांधकाम व्यवसायामध्ये विशेषत: पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये कुशल कामगारांची मोठी कमतरता भासते. भारताबरोबरच परदेशातील बांधकाम व्यावसायिकांनाही या समस्येला तोंड द्यावे लागते. बºयाच मोठ्या प्रकल्पांसाठी देशांतर्गत तसेच परदेशातूनही कुशल कामगार आणावे लागतात. या समस्येवर मात करण्यासाठी, तसेच बेरोजगार युवकांना रोजगाराचा चांगला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ‘क्रेडाइ’ने पुढाकार घेतला आहे. क्रेडाइच्या माध्यमातून देशभरातील १५६ शहर-निमशहरांमध्ये दारिद्र्य रेषेखालील युवकांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येते. सहा आठवड्यांच्या कालावधीत त्यांना बांधकाम व्यावसायासाठी आवश्यक, गवंडी काम, प्लम्बिंग, इलेक्ट्रिशिअन, अशा नानाविध गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते, तसेच त्यानंतर जवळच्या शहरांत रोजगारही उपलब्ध करून देण्यात येतो, अशी माहिती क्रेडाइच्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Builders took initiative for skill development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.