पनवेल : शहरातील भुसार मोहल्ल्यातील मोडकळीस आलेली दुमजली इमारत शुक्रवारी कोसळली. त्यामध्ये कोणतीही जीवित हानी नाही. मात्र इमारतीत रहात असलेले भाडेकरू कुटुंब रस्त्यावर आले आहेत. पालिका प्रशासनाने या वास्तूला पूर्वी धोकादायक म्हणून घोषित केले होते.बावाराम पुरोहित यांच्या मालकीची शंभर वर्षांपूर्वी जुनी ही इमारत होती. पुरोहित या वरच्या मजल्यावर राहत असत आणि खाली पटेल कुटुंबीय भाडेतत्त्वावर राहत होते. पालिकेने ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर करून नोटीसही बजावली होती. त्यामुळे पुरोहित कुटुंबीय दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेले होते. मात्र पटेल यांना पर्यायी जागा न दिल्याने त्यांनी जागा खाली केली नव्हती. आज दुपारी ही इमारत अचानक कोसळली. यामध्ये एक महिला आणि दोन मुले सुदैवाने बचावले. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा चारुशीला घरत, बांधकाम सभापती राजू सोनी आदींनी याठिकाणी भेट दिली. (वार्ताहर)
भुसार मोहल्ल्यात इमारत कोसळली
By admin | Published: November 07, 2014 10:56 PM