मुंबईतील विद्याविहारमध्ये इमारतीचा भाग कोसळला, दोघांची सुखरुप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:39 PM2018-01-12T23:39:02+5:302018-01-13T07:03:39+5:30
मुंबईतील विद्याविहार येथील परिसरात एका तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत तीन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई : मुंबईतील विद्याविहार येथील परिसरात एका तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत सुरुवातीला तीन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, दोघे जण अडकले होते, त्यांना सुखरुप बाहेर काढले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्याविहार येथील कर्सन जेठा या तीन मजली इमारतीच्या जिन्याचा काहीसा भाग रात्री अकराच्या सुमारास कोसळला. या कोसळलेल्या ढिगा-याखाली तीन जण अडकले असल्याची माहिती देण्यात आली. मात्र. या ढिगा-याखाली दोघे जण अडकले होते. या अडकलेल्या दोघांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली असून दोघेही या घटनेत किरकोळ जखमी झाले आहे. तसेच, आता हा ढिगारा हटविण्याचे काम सरु आहे.
Section of a staircase collapses in a building in Mumbai’s Vidya Vihar. Two people rescued, ops underway
— ANI (@ANI) January 12, 2018
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील म्हाडाच्या मालकीच्या जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. येथील झवेरी बाजारातील छिपी चाळ येथील इमारत क्रमांक ५०-५२ मधील चौथ्या मजल्याचा फ्लोरिंग स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत डागडुजीचे काम करणारे चार मजूर गाडले गेल्याची माहिती उशिरापर्यंत कळाली होती. मात्र, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या मजुरांची सुखरुप सुटका केली होती.