Join us

'पोलीस हा, सुरक्षिततेसाठी जागरूक हा'; कॅन्सर पीडित पोलिसाची सतर्कता,...अन वाचले रहिवाशांचे प्राण

By गौरी टेंबकर | Published: September 28, 2022 9:44 AM

पोलीस हा... सुरक्षिततेसाठी जागरूक हा, दहिसर पूर्वच्या अशोकवन परिसरात असलेल्या श्रीनाथनगर सोसायटीमधील ही घटना आहे.

मुंबई: दहिसरच्या सात मजली इमारतीत दोन आठवड्यापूर्वी तळ मजल्यावर असलेल्या मिटर बॉक्सने पेट घेतला सर्व रहिवासी आत अडकुन धुरामुळे गुदमरू लागले. मात्र गेली कित्येक वर्षे कॅन्सर सरख्या दुर्धर विकाराने ग्रस्त असल्याने ५० केमो थेरपी तसेच दोन शस्त्रक्रिया झालेले आणि ऑफ ड्युटी असलेले पोलीस हवालदार संदीप डावरे यांनी प्रसंगावधान साधत या सर्वाचा जीव वाचवला. त्यासाठी या आठवड्यात त्यांचा सत्कार करण्यात येणार असून खऱ्या अर्थाने 'पोलीस हा, सुरक्षिततेसाठी जागरूक हा ' या ओळीचा प्रत्यय आम्हाला आल्याची भावना मंगळवारी रहिवाशांनी व्यक्त केली.दहिसर पूर्वच्या अशोकवन परिसरात असलेल्या श्रीनाथनगर सोसायटीमधील ही घटना आहे. याठिकाणी डी विंग मध्ये असलेल्या मिटर बॉक्सने १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या सुमारास अचानक पेट घेतला. कॅन्सरशी झुंज देताना ५० हून अधिक केमोथेरपी तसेच दोन शस्त्रक्रिया झालेले व ओशिवरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले डावरे हे रात्रपाळी करून घरी आराम करत होते. तितक्यात शेजारच्या १०२ क्रमांकाच्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या गीता अय्यर (६९) यांच्या घरच्यांनी त्यांचा दरवाजा जोरजोरात ठोठावला. डावरेनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या घरातही धूर पासरण्यास सुरवात झाली आणि आग लागल्याचे त्यांना समजले कारण  इमारती मधील नागरिक घाबरुन जीवाच्या आकांताने ओरडू लागले. ते पाहून डावरे लगेच तळ मजल्याच्या दिशेने धावले आणि धूर घरात शिरून कोणी गुदमरू नये म्हणून सर्वांना फ्लॅटचा दरवाजा बंद ठेवा असे सांगीतले.  पोलीस व अग्निशमन दलाला फोन करे पर्यंत धूर तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचला. आग वाढण्याची शक्यता असल्याने उर्वरीत सर्वांना गच्चीवर नेणे आवश्यक होते. त्यामुळे डावरे टेरेसच्या दिशेने गेले तेव्हा ग्रील लॉक असल्याने हातोड्याची सोय करत त्यांनी ते तोडले. त्यानंतर बाकीच्या रहिवाशांना टेरेसवर हलविण्यात आले. काही वेळाने पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तातडीने आग विझविली.सोल्जर , नेव्हर ऑफ ड्युटीडावरे हे घरी होते त्यामुळे त्यांनी योग्य ती धावपळ केली आणि आम्हाला गुदमरून मरण्या पासून वाचविले. ते म्हणतात ना ए सोल्जर , नेव्हर ऑफ ड्युटी, त्यांच्यामुळे आम्ही सुरक्षीत आहोत.(गीता अय्यर - स्थानिक महिला)सोसायटी करणार सत्कारआगिसोबत दोन हात करण्यासाठी लागणारी कोणतीही यंत्रसामग्री जवळ नसताना साध्या वेशातील या पोलिसाने नागरिकांचे जीव वाचविले. त्यासाठी त्यांचा सत्कार करण्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविले आहे....आधीही केलेले रेस्क्यु ऑपरेशन!काही महिन्यांपूर्वी जोगेश्वरीच्या खान इस्टेट सोसायटी या २१ मजली टॉवरमध्येही १७ मजले चढून जात त्यांनी असेच रेस्क्यू ऑपरेशन राबविले होते.

टॅग्स :पोलिस