जोगेश्वरीत इमारतीची संरक्षण भिंत कोसळली, 6 कार आणि एका दुचाकीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 08:56 AM2018-06-17T08:56:28+5:302018-06-17T08:56:28+5:30
मुंबईतील जोगेश्वरी परिसरात इमारतीची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले आहे.
मुंबई - मुंबईतील जोगेश्वरी परिसरात इमारतीची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाहीत.
Wall of a building in Jogeshwari area collapsed due to incessant rain in #Mumbai; six cars & 1 bike in the parking damaged. Fire brigade & police team present at the spot. No injuries reported. #Maharashtrapic.twitter.com/Pr95BjqiDs
— ANI (@ANI) June 17, 2018
काल सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दोन इमारतींमध्ये असलेली ही संरक्षण भिंत कमकुवत झाली होती.त्यामुळे रहिवाशांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भिंतीजवळील भाग रिकामा केला होता. अखेर रात्री ही भिंत कोसळली. या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले.
#More visuals from the spot in Jogeshwari area where a wall of a building collapsed due to incessant rain in #Mumbai; six cars & 1 bike in the parking damaged. Fire brigade & police team present at the spot. No injuries reported. #Maharashtrapic.twitter.com/nA5lyFNJfr
— ANI (@ANI) June 17, 2018