इमारती धोकादायक नव्हेच

By admin | Published: July 3, 2014 02:11 AM2014-07-03T02:11:27+5:302014-07-03T02:11:27+5:30

शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे हा आरोप केला़ अनेक ठिकाणी धोकादायक इमारतीमधील रहिवासी स्वत: दुरुस्तीसाठी तयार आहेत़ तरीही इमारत रिकामी करण्यासाठी त्यांना भाग पाडले जाते़

Buildings are not dangerous | इमारती धोकादायक नव्हेच

इमारती धोकादायक नव्हेच

Next

मुंबई : इमारतींवर धोकादायक असल्याची नोटीस लावून पालिका अधिकारी पळ काढत आहेत़ मात्र मृत्यूचे भय दाखवून मराठी माणसाला एकप्रकारे मुंबईतून हद्दपार करण्याचा हा डाव असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या नगरसेविकेने स्थायी समितीमध्ये आज खळबळ उडवून दिली़
शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे हा आरोप केला़ अनेक ठिकाणी धोकादायक इमारतीमधील रहिवासी स्वत: दुरुस्तीसाठी तयार आहेत़ तरीही इमारत रिकामी करण्यासाठी त्यांना भाग पाडले जाते़ पर्यायी घरेही मुंबईबाहेर व दुरवस्थेत असल्याने हा प्रकार म्हणजे मराठी माणसाला हद्दपार करण्याचा डाव असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला़ तर विकासकाच्या आहारी जाऊन इमारती रिकामी करून घेऊ नयेत, असे सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी सुनावले़
अधिकारी इमारतीवर नोटीस लावतात़, परंतु त्यात नागरिकांना आवश्यक माहिती देण्यात येत नाही़ तर धोकादायक इमारतींची जबाबदारी असलेले अधिकारी पालिका मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर दिवसभर उभे असतात, अशी धक्कादायक माहिती समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी दिली़ त्याचबरोबर इमारती दुरुस्तीसाठी फंड व धोरण पालिकेकडे नाही, अशी नाराजी भाजपाचे दिलीप पटेल यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Buildings are not dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.