१० हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 03:44 PM2020-09-06T15:44:36+5:302020-09-06T15:45:06+5:30

पोस्ट कोविड ओपिडी सुरु करण्याचे निर्देश

Buildings with more than 10 patients will be sealed | १० हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील होणार

१० हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील होणार

Next

 

मुंबई : सद्यस्थितीचा विचार करता मुंबईत ७ हजार ९९ इमारती सील तर कटेनमेंट झोनची संख्या ५६८ एवढी असून, १० हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील होणार आहेत. ही कार्यवाही करतानाच पोस्ट कोविड ओपिडी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा ओपिडी सुरु झाल्यास कोविड पश्चात रुग्णांची नेमकी माहिती मिळून त्यांच्यावर उपचार करता येतील, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.  

कोरोनासंदर्भातील विविध उपाययोजना, अडचणींचा आढावा घेताना मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत वॉर्ड अधिकाऱ्यांनी रोज चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला, ताप असणाऱ्या रुग्णांवर अँटीजेन टेस्ट करावी. अँटीजेन टेस्टचा वापर टार्गेट ग्रुपवर केल्यास अधिक चांगले परिणाम येतील. सरकारी आणि खासगी इस्पितळांत लक्षणे नसलेल्यांना बेड देण्यात येवू नयेत. खासगी रुग्णालयांच्या मनमानीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

१० हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील करण्यात याव्यात. पोस्ट कोविड ओपिडी सुरु केलया जाणार आहे. अशा ओपिडी सुरु झाल्यास कोविड पश्चात रुग्णांची नेमकी माहिती मिळून त्यांच्यावर उपचार करता येतील. जंबो रुग्णालयांच्या आसपासच्या मोठ्या खासगी रुग्णालयांच्या तज्ज्ञांनी जंबो रुग्णालयांना मार्गदर्शन करावे. टेलिमेडिसीनसारखे उपक्रम राबवून कोरोना संक्रमणास रोखण्यासाठी शासन, पालिका प्रशासनास सहकार्य करावे. ज्या वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा दर अधिक आहे तेथे विशेष उपाययोजना राबविण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिल्या आहेत.  

----------------

मुंबई महापालिका काय म्हणते?

मुंबईतले ११ वॉर्ड बी,सी, ए, आरएन, एमडब्ल्यू, एचडब्ल्यू, एचई, एमई, पीएस, एफएन, ई यामध्ये कोविड पॉझिटिव्हचे प्रमाण खूप कमी म्हणजे ७ ते ८ टक्के इतके आढळले तर उर्वरित १३  वार्डात अधिक पॉझिटिव्हीटी आढळत आहे.

मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यू दर कमी होत आहे. जून मध्ये तो ५.५८ टक्के, जुलै ४.८८ टक्के, ऑगस्ट ४.०७ टक्के, सप्टेंबर २.६ टक्के आहे.

Web Title: Buildings with more than 10 patients will be sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.