अतिक्रमणांमुळे तीन वर्षांत बांधली फक्त २५०० घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 05:36 AM2018-09-12T05:36:52+5:302018-09-12T05:37:01+5:30

परवडणाऱ्या घरांसाठी मुंबईकर म्हाडाच्या घरांकडे अपेक्षेने पाहतात.

Built in three years due to encroachments, only 2500 houses | अतिक्रमणांमुळे तीन वर्षांत बांधली फक्त २५०० घरे

अतिक्रमणांमुळे तीन वर्षांत बांधली फक्त २५०० घरे

Next

- अजय परचुरे 
मुंबई : परवडणाऱ्या घरांसाठी मुंबईकर म्हाडाच्या घरांकडे अपेक्षेने पाहतात. याच पार्श्वभूमीवर २०१५ ते २०२० या ५ वर्षांच्या कालावधीत म्हाडाने १५,२२६ घरे मुंबईत बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यातील गेल्या ३ वर्षांत म्हाडाने फक्त २५०० घरे बांधून पूर्ण केली. याचे प्रमुख कारण म्हणजे म्हाडाच्या ताब्यातील मुंबईतील जमिनींवरील अतिक्रमण हे असून त्यामुळेच म्हाडा अपेक्षित उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नसल्याचे खुद्द म्हाडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष उदय सामंत यांनीच मान्य केले.
आमदार उदय सामंत यांनी सोमवारी आपल्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला. मंगळवारी घेतलेल्या अधिकाºयांच्या बैठकीत मुंबईतील म्हाडाच्या घरांसंदर्भातील ही धक्कादायक बाब त्यांच्यासमोर आली. सामंत यांनी घेतलेल्या माहितीनुसार २०१५पासून झालेल्या मुंबई मंडळांच्या लॉटरीतील २५०० घरेच बांधून तयार आहेत. मुंबईतील अनेक जमिनींवर एकतर कंत्राटदार किंवा अन्य काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. याचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक आहे. तर अनेक जमिनींबाबत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायलय किंवा स्थानिक न्यायालयात केसेस सुरू आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे सरकारने गेली कित्येक वर्षे
१ जिल्हाधिकारी, १ तहसीलदार, ५ नायब तहसीलदार यांची पदे भरलेली नाहीत. ही पदे भरल्यास त्यांच्या कक्षेत येणाºया अतिक्रमणासारख्या बाबी सहजतेने सोडविता येतील. मात्र गेली कित्येक वर्षे म्हाडाला संलग्न असलेल्या या पदांचा कार्यभार म्हाडाचे इंजिनीअर सांभाळत आहेत. तसेच म्हाडाकडे अजूनही मुंबईतील किती क्षेत्रफळाची जमीन आहे याची माहिती उपलब्ध नाही. लवकरच ही माहिती घेण्यात येईल, असे सामंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
>सात ते आठ हजार घरे बांधणार
मुंबईत म्हाडाची किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती पुढच्या आठ दिवसांत तयार करण्याचे आदेश उदय सामंत यांनी म्हाडाच्या अधिकाºयांना दिले आहेत. आतापर्यंत बांधण्यात आलेल्या घरांची संख्या पाहता २०२०पर्यंत १५ हजार घरांचे उद्दिष्ट म्हाडा पूर्ण करू शकणार नाही. मात्र ७ ते ८ हजार घरे नक्कीच बांधण्यात येतील, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

Web Title: Built in three years due to encroachments, only 2500 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा