मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या तिकिटाचे दर सामान्य रेल्वेइतकेच असतील, असे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. शिवाय, मुंबई-अहमदाबाद पाठोपाठ मुंबई-पुणे,े तसेच मुंबई-नाशिक बुलेट ट्रेन करण्याचाही आमचा मानस असून, त्याची व्यवहार्यता अभ्यासली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले.काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनबाबतीत विरोधकांचे आरोप खोडून काढले. देशातील फक्त तीन टक्के लोक विमानाने प्रवास करतात, पण आपण विमानतळ तयार करतोच ना? दळणवळण हाच विकासाचा पाया आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा हा प्रकल्प रद्द करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी या प्रकल्पाचा करार केला होता. जपानची कंपनी यासाठी एक लाख कोटींचे कर्ज देत आहे. त्याची सुरुवातीचे २० वर्षे परतफेड करायची नाही. त्यानंतर, फक्त अर्धा टक्का व्याजदराने या रकमेचीपरतफेड करायची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यामुळे महाराष्ट्रात ३३ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्याशिवाय या प्रकल्पामुळे स्टील, सिमेंटच्या उद्योगाला चालनामिळणार असून, असंख्य रोजगार निर्माण होणार आहे. सुविधांसाठी केंद्र सरकारने ४० हजार कोटींची तरतूद केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मुंबईतच आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रमुंबई हे नैसर्गिक आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र असल्यामुळे मुंबईशिवाय आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र पूर्ण होऊच शकत नाही. जेव्हा मुंबईत बुलेट ट्रेनच्या स्टेशनचा पाया घातला जाईल, तेव्हाच या वित्तीय सेवा केंद्राचे तळघरातील तीन मजले तयार झालेले असतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
बुलेट ट्रेनचे भाडे सामान्य रेल्वेप्रमाणेच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:30 PM