बुलेट ट्रेन! १०० खाबांच्या पायाभरणीचे काम पूर्ण
By सचिन लुंगसे | Published: May 9, 2024 06:59 PM2024-05-09T18:59:44+5:302024-05-09T19:00:00+5:30
बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत सात नद्यांवर पूलाची कामे सुरु आहेत.
मुंबई : मुंबई ते अहमदाबादला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु असून, आता पालघर जिल्ह्यातील १०० खाबांच्या पायाभरणीचे काम पुर्ण झाल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात आली. या व्यतीरिक्त ठाणे, बोईसर आणि विरार येथील स्थानकांच्या कामांसह पूल व डोंगरातील बोगद्यांच्या कामांनाही वेग पकडल्याचे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून सांगण्यात आले.
बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत सात नद्यांवर पूलाची कामे सुरु आहेत. यातील वल्साड, नवसारी, खेड या जिल्हयांतील कामे पुर्ण झाली आहेत तर नर्मदा, तापी, माही आणि साबरमतीमधील कामे प्रगतीपथावर आहेत. याव्यतीरिक्त १२ स्थानकांचे कामही सुरु असून, बांधकामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हे काम सुरु आहे. ट्रॅकचे कामही सुरु झाले असून, गुजरात राज्यातील ३०० किमी मार्गावरील खाबांचे काम पुर्ण झाले आहे.
मुंबई ते अहमदाबादला जोडणा-या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु असून, सध्या १६० किलोमीटर मार्गावरील व्हायडक्ट आणि ३०० किमी मार्गावरील खाबांचे काम पुर्ण झाले आहे.
- मुंबई ते अहमदाबाद ५०८ किलोमीटर
- ठाणे व पालघर जिल्हयातील ब्रीज, क्रॉसिंग, स्टील ब्रीज आणि डोंगराळ भागातील बहुतांशी कामे सुरु आहेत.
- बुलेट ट्रेनकरिता जमिनीखाली ३२ मीटर खोल खोदकाम केले जात आहे.
- मुंबईत बुलेट ट्रेनची चार स्थानके असून, या स्थानकांत वांद्रे - कुर्ला संकुल, ठाणे, विरार आणि बोईसर या चार स्थानकांचा समावेश आहे.
- वांद्रे - कुर्ला संकुल हे स्थानक भूमीगत आहे. उर्वरित तिन्ही स्थानके जमिनीवर आहेत.
- वांद्रे - कुर्ला संकुल येथून सुरु होणारी बुलेट ट्रेन शिळफाटयापर्यंत भूमिगत धावणार आहे.