बुलेट ट्रेनचे भारतीय कर्मचारी शिकले जपानी भाषा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 05:59 AM2019-12-22T05:59:59+5:302019-12-22T06:00:10+5:30
संवाद साधणे सोपे व्हावे यासाठी प्रयत्न । १४० जणांनी भाषेसह संस्कृतीही करून घेतली ओळख
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मुंबई-अहमदाबाद बुलेट हायस्पीड ओळखला जातो. या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी जपानची आर्थिक आणि विविध पायाभूत मदत मिळणार आहे. त्यामुळे जपानी कर्मचाऱ्यांशी भारतीय कर्मचाऱ्यांना व्यावहारिक संवाद साधण्यासाठीचा प्रयत्न म्हणून भारतीय कर्मचाºयांनी जपानी भाषा अवगत केली आहे.
जपानच्या साह्याने मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाची कामे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या वतीने पाहिली जात आहेत. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या एकूण ७२ भारतीय कर्मचाºयांनी नुकतीच जपानी भाषा शिकली आहे. या भाषेचे त्यांना प्रमाणपत्रदेखील मिळाले आहे. जपानी भाषा आणि संस्कृती याचे ज्ञान कर्मचाºयांना मिळाले आहे. मागील पाच महिन्यांपासून कर्मचारी जपानी भाषेचा अभ्यास करत होते.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या मुंबई, पालघर, बडोदा, अहमदाबाद आणि सुरत या ठिकाणांतील ७२ कर्मचाºयांना जपानी भाषेचे शिक्षण दिले आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी कर्मचाºयांना प्रमाणपत्राचे वितरण नुकताच केले. जपानी फाउंडेशन यांच्या वतीने मागील दीड वर्षांपासून हे शिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत १४० भारतीय कर्मचाºयांना जपानी भाषेचे शिक्षण आणि संस्कृतीची ओळख करून घेतल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाºयांनी दिली.
बुलेट ट्रेनच्या कामाचा आढावा
५०८ किमीचा मुंबई-अहमदाबाद बुलेट हायस्पीड प्रकल्पासाठी विशेष निधी म्हणून सुमारे १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर २०१८ मधील अर्थसंकल्पात ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी १.०८ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी आर्थिक साहाय्य जपान देशाकडून मिळणार आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जून महिन्यांपर्यंत १ हजार ३८० हेक्टरपैकी ४१४ जमीन संपादित केली, तर आतापर्यंत ७०५ हेक्टर जमीन संपादित केली आहे. गुजरातमधील ९४० हेक्टर जमिनीपैकी ६१७ हेक्टर, महाराष्ट्रातील ४३१ पैकी ८१ हेक्टर आणि दादरा नगर हवेली मधील ८.७ हेक्टरपैकी ६.९ हेक्टर जमीन संपादित केली आहे.