मुंबई - भारतीय रेल्वेसमोर अनेक समस्या असताना बुलेट ट्रेनसारखे आवश्यक आहेत का असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मात्र सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने बुलेट ट्रेन फायदेशीर आहे. बुलेट ट्रेनसोबत नवे तंत्रज्ञान आल्यावर विचार बदलेल आणि एकदा सुरुवात झाली की, बुलेट ट्रेनचे जाळे विस्तारण्यास वेळ लागणार नाही. मग देशभरात बुलेट ट्रेनचा मार्ग 10 हजार किमीपर्यंत विस्तारता येईल. त्यातून आग्रा-बनारस, मुंबई-बंगळुरू, कोलकाता ते दिल्ली अशा मार्गांवरही बुलेट ट्रेन धावू लागेल, असा विश्वास रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी झालेल्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर 2018' या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना 'महाराष्ट्र भूषण' या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी दिबांग यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत पियूष गोयल म्हणाले, मात्र सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने बुलेट ट्रेन फायदेशीर आहे. जेव्हा बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेनचे जाळे विस्तारेल, तेव्हा आम्ही प्रवाशांना उत्तम सुविधा देऊ शकणार आहोत. बुलेट ट्रेनमुळे मुख्य रेल्वे मार्गावरील ट्रॅफिकचा भार कमी होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील इंधनाचीही बचत होणार आहे. तसेच बुलेट ट्रेनसोबत नवे तंत्रज्ञान आल्यावर विचार बदलेल. त्यात आपण टेक्नॉलॉजी ट्रान्फरसाठी करार केला आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान आपणास मिळेल. मग एकदा सुरुवात झाली की, बुलेट ट्रेनचे जाळे विस्तारण्यास वेळ लागणार नाही. मग देशभरात बुलेट ट्रेनचा मार्ग 10 हजार किमीपर्यंत विस्तारता येईल. त्यातून आग्रा-बनारस, मुंबई-बंगळुरू, कोलकाता ते दिल्ली अशा मार्गांवरही बुलेट ट्रेन धावू लागेल," नवे तंत्रज्ञान आणताना आपल्या देशात नेहमीच विरोध होते. 1969 साली जेव्हा राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती तेव्हाही विरोध झाला होता. मात्र आज त्या ट्रेनमधूल लाखो प्रवासी प्रवास करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच सध्या जपानने दिलेले बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञानही 1964 सालातील आहे. मात्र एकदा नवे तंत्रज्ञान आले की देशवासियांची मानसिकता बदलेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारतीय रेल्वेच्या सद्यस्थितीविषयी प्रश्न केला असता, रेल्वेमंत्रालयाचा कार्यभार सांभाळल्यावर रेल्वेच्या सुरक्षेवर अधिक भर दिला आहे. त्यासाठी रेल्वेचे ट्रॅक बदलण्याचे काम वेगात सुरू आहे. रेल्वेमार्गाच्या देखभाल दुरुस्ती अनिवार्य केली आहे. त्यामुळे 2019 च्या मार्च महिन्यापर्यंत रेल्वे वेळापत्रकानुसार धावू लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बुलेट ट्रेनचे जाळे विस्तारणार, देशभरात 10 हजार किमी मार्ग बांधण्याचा मानस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 1:37 PM