Join us

राज भवनमधील भुयार हाेणार पर्यटकांसाठी खुले ; राष्ट्रपतींच्या हस्ते आज उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 6:38 PM

तीन वर्षांपूर्वी मुंबईतील राजभवनमध्ये सापडलेल्या भुयाराचे संग्रहालायता रुपांतर करण्यात आले असून राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

मुंबई : तीन वर्षापूर्वी मुंबईतील राजभवन येथे सापडलेल्या भुयाराचे 15 हजार स्क्वेअर फुटाच्या संग्रहालयात रुपांतर करण्यात आले आहे. आज राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. लवकरच हे संग्रहालाय पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून ब्रिटीश काळाची माहिती मिळणार आहे. 

ऑगस्ट 2016 मध्ये राजभवन मधील ब्रिटीशकालीन भुयाराचा शाेध लागला हाेता. 60 वर्षानंतर पुन्हा एकदा ते भुयार खाेलण्यात आले हाेते. 15 हजार स्क्वेअर फुटांमध्ये तयार करण्यात आलेल्या संग्रहालायात पर्यटकांना राजभवनाचा इतिहास कळणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या वैभावाची ओळख देखील पर्यटकांना करुन देण्यात येणार आहे. यासाठी हेलाेग्राफिक प्राेजेक्शन तंत्रज्ञानाचा उपयाेग करण्यात येणार आहे. 

या भुयाराविषयी आणि संग्रहालायाविषयी बाेलताना राज्यपाल डाॅ. सी. विद्यासागर राव म्हणाले, राजभवनमध्ये सापडलेल्या भुयाराबद्दल महाराष्ट्रातील तसेच देशातील जनतेच्या मनात कुतुहल निर्माण झाले हाेते. हे भुयार पुन्हा खुले करण्यात अनेक अडचणी हाेत्या. परंतु त्या सर्व अडचणींवर मात करत हे भुयार आता नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्याचबराेबर एक संग्रहालय सुद्धा उभारण्यात आले असून त्याद्वारे नागरिकांना इतिहास माहिती घेता येणार आहे. 

भुयाराला 20 फुटांचे दार असून 13 खाेल्या आहेत. येत्या ऑक्टाेबर- नाेव्हेंबरमध्ये या भुयाराची सैर नागरिकांना करता येणार आहे. या भुयाराची तसेच संग्रहालयाची माहिती ऑडिओ व्हिज्युअल्सच्या स्वरुपात नागरिकांना घेता येणार आहे. 

टॅग्स :मुंबईबंकर्सइतिहासरामनाथ कोविंद