मुंबई : राजभवन येथे आढळलेल्या बंकरचे सुयोग्य जतन व्हावे, यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचा निर्णय राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे झालेल्या बैठकीत झाला.राजभवन येथे आढळलेल्या बंकरचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्यपाल विद्यासागर राव यांनी बैठक घेतली. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर, छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ. सब्यसाची मुखर्जी, सर जे.जे. स्कूल आॅफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे विभागीय संचालक (पश्चिम) डॉ. नाभिराजन, वेस्टर्न नेव्हल कमांडचे कमांडर सुनील बालकृष्णन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे व इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. ही समिती बंकर संवर्धनाचा आराखडा तयार करील.
राजभवनमधील ‘त्या’ बंकरचे होणार जतन
By admin | Published: August 20, 2016 5:02 AM