मुंबई : मुंबईसह इतर जिल्ह्यातील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी तत्काळ रुजू करावे असे परिपत्रक निवडणूक कार्यालयाने शाळांना दिले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे.सुटीत शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार असल्याने शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. काही मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापक संघटनेकडे तक्रारी केल्या आहेत की, शिक्षकांना रुजू करून घेण्यासाठी आमच्यावर दबाव वाढत आहे. याबाबत मुख्याध्यापक संघटनेकडे मुख्याध्यापकांनी तक्रारी केल्या. शिक्षकांवर लादलेल्या निवडणूक कामाचा तसेच मुख्याध्यापकांवर टाकण्यात येत असलेल्या दबावाचा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटना निषेध करत असल्याचे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडिज यांनी सांगितले.
शिक्षकांच्या पाठीवर निवडणूक कामांचे ओझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 1:04 AM