नवी मुंबई : नेरूळमध्ये नुकत्याच झालेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी दीपक सुनील भोसले या आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून 1 लाख 15क्क् रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
नेरूळमधील सुवर्णा संजय गुरव यांच्या घरामध्ये 23 जूनला चोरी झाली होती. चोरटय़ांनी दरवाजाचे कुलूप तोडून आतमधील रोख रक्कम व तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 12 ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता शिंदे- अल्फान्सो त्यांच्या सहका:यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. करावे गावात राहणा:या दीपक भोसले याने हा गुन्हा केल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यास अटक केली आहे. त्याच्याकडून दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे.
अटक केलेला आरोपी सराईत गुन्हेगार आहे. एनआरआय पोलिस स्टेशनमधील दोन गुन्ह्यांमध्ये तो नुकताच तुरुंगात जाऊन आला आहे. त्याने आतार्पयत 5 ते 6 गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्याकडून कटावणी, हातोडा ही हत्यारे जप्त केली आहेत. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली असून त्याने अजून काही गुन्हे केले आहेत का याची पोलिस चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)