फाइल जळीतप्रकरणी संशयाचा धूर, म्हाडाच्या १८ फायली जळाल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 04:32 AM2018-07-13T04:32:21+5:302018-07-13T04:33:06+5:30
डिसेंबर २०१७मध्ये नवी मुंबईतील शील कंपनीत लागलेल्या आगीत म्हाडाच्या तब्बल १८ हजार फायली जळून खाक झाल्या. या घटनेमागे घातपात असण्याचा संशय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राइम ब्रांचच्या तपास अधिका-यांनी वर्तवला आहे.
मुंबई - डिसेंबर २०१७मध्ये नवी मुंबईतील शील कंपनीत लागलेल्या आगीत म्हाडाच्या तब्बल १८ हजार फायली जळून खाक झाल्या. या घटनेमागे घातपात असण्याचा संशय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राइम ब्रांचच्या तपास अधिकाºयांनी वर्तवला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ही आग शॉर्टसर्किटने लागली नसल्याची प्राथमिक माहिती विद्युत इन्स्पेक्टरने तपास अधिकाºयांना दिल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
नवी मुंबईतील महापेमध्ये असणाºया शील कंपनीमध्ये म्हाडा आणि झोपडपट्टी विकास प्राधिकरणा (एसआरए)च्या महत्त्वाच्या फायली सुरक्षित ठेवल्या होत्या. यासाठी शील कंपनीसोबत करारही करण्यात आला होता. शील कंपनीच्या ४ क्रमांकाच्या विभागात १८ हजार महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या फायली सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र ११ डिसेंबर २०१७ ला या विभागाला भीषण आग लागली. यात फायली जळाल्या. क्राइम ब्रांचकडे या घटनेचा तपास आल्यानंतर तपास अधिकाºयांनी केलेल्या तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
११ डिसेंबरला लागलेली भीषण आग विझविण्यात आली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या विद्युत इन्स्पेक्टरने दिलेल्या प्राथमिक अहवालात ही आग शॉर्टसर्किटने लागली नसल्याची माहिती दिली होती. हीच माहिती या विद्युत इन्स्पेक्टरने क्राइम ब्रांचच्या तपास अधिकाºयांनाही चौकशीदरम्यान दिली आहे. तसेच म्हाडा व शील प्रोजेक्ट लिमिटेड यांच्यात १२ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या करारानुसार म्हाडाच्या ५ लाख ३४ हजार ४७६ फायली जतन करण्यासाठी देण्यात आल्या होत्या. त्यापैकी एकूण १७ हजार ९९० जळाल्या असून ४ हजार ७४९ फायली पाण्याने भिजल्या आहेत. तपास अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत म्हाडाच्या याच फायलींसोबत शील कंपनीत सुरक्षेसाठी जतन करून ठेवण्यासाठी अजून ६० कंपन्यांच्या फायलीही होत्या. या ६० कंपन्यांच्या काही फायलीही या आगीत जळाल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या काही महत्त्वाच्या फायली जाळण्याचा कोणाचा डाव होता का? याचीही तपासणी करण्यात येणार आहे.
माहितीत तफावत
आग विझविण्यात आली तेव्हा तिथे उपस्थित विद्युत इन्स्पेक्टरने दिलेल्या प्राथमिक अहवालात ही आग शॉर्टसर्किटने लागली नसल्याची माहिती दिली होती. मात्र शील कंपनीच्या मालकाने ट्युबलाइटमधून झालेल्या शॉर्टसर्किटने आग लागल्याची माहिती आमच्या तपास पथकाला चौकशीदरम्यान दिली आहे. सोबतच इतर ६० कंपन्यांनीही आपली महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याची माहिती दिली आहे. दोघांनीही दिलेल्या माहितीत तफावत आहे. त्यामुळे सर्व फायलींची माहिती शील कंपनीच्या व्यवस्थापनाकडून घेऊन यात शॉर्टसर्किट आहे की आग लावण्यामागे घातपात आहे, या दिशेने आता तपासाची सूत्रे हलणार आहेत.
- तुषार दोषी, पोलीस उपायुक्त (गुन्हे), नवी मुंबई