‘रातराणी’च्या मार्गावर विनावातानुकूलित शयनयान बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 06:02 AM2018-04-11T06:02:01+5:302018-04-11T06:02:01+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खासगी बसच्या असुरक्षित प्रवासी वाहतुकीला हद्दपार करण्यासाठी, विनावातानुकूलित शयनयान बस घेण्याचा निर्णय घेतला आहे.

The bus is not easy to sit on the night of 'nightfall' | ‘रातराणी’च्या मार्गावर विनावातानुकूलित शयनयान बस

‘रातराणी’च्या मार्गावर विनावातानुकूलित शयनयान बस

Next

- महेश चेमटे 
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खासगी बसच्या असुरक्षित प्रवासी वाहतुकीला हद्दपार करण्यासाठी, विनावातानुकूलित शयनयान बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या विनावातानुकूलित शयनयान एसटीला राज्यात नोंदणीसाठी मान्यता देण्यात आली आहे. नव्याने दाखल होणाऱ्या शयनयान एसटी या सध्या धावत असलेल्या रातराणीच्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
एसटी आगार-स्थानकांतून खासगी वाहतुकीला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याबाबत, एसटी महामंडळात नुकतीच बैठक पार पडली. या वेळी प्रवाशांना परवडणा-या दरात उच्च प्रतीच्या सुविधा देण्यासाठी विनावातानुकूलित शयनयान बसखरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शयनयान बसचे डिझाइन सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्टकडे तपासणी आणि मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. या डिझाइनला मंजुरी मिळताच, निविदा प्रक्रियेतून शयनयान बसखरेदी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. राज्यात खासगी विनावातानुकूलित शयनयान बसला नोंदणीसाठी बंदी आहे. तथापि, सार्वजनिक सेवा पुरविणाºया एसटीच्या नोंदणीसाठी कोणत्याही स्वरूपाची बंदी नाही. मान्यता मिळाल्याने राज्यात एसटीच्या विनावातानुकूलित शयनयान एसटीची नोंदणी सहज होणार असून, लवकरच प्रवासी सेवेत ही बस रूजू होणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंग देओल यांनी दिली.
राज्यात प्रवाशांचा अभिमान असलेल्या रातराणी मार्गिकेवर विनावातानुकूलित शयनयान एसटी चालविण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. सद्यस्थितीत राज्यातील रातराणीच्या मार्गिकेवर १०० पेक्षा जास्त बस धावत आहेत. टप्प्याटप्प्याने विनावातानुकूलित शयनयान एसटीचा समावेश या मार्गिकेत करण्यात येणार असल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
>कराराकडे लक्ष
नव्याने दाखल झालेल्या शिवशाहीमध्ये (बैठे आसन) करारानुसार चालक खासगी कंपनीचा आणि वाहक महामंडळाचा आहे. अपघात झाल्यास अपघात स्थळावरुन पळ काढल्याच्या घटना खासगी चालकांकडून घडल्या आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे. शिवशाहीप्रमाणे यादेखील एसटी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. परिणामी, नॉनएसी शयनयान एसटीसाठी खासगी कंपनीसोबत महामंडळ नक्की कोणत्या स्वरूपाचा करार करेल, यावर प्रवाशांचा प्रतिसाद अवलंबून असणार असल्याचे एसटीतील जाणकार सांगतात.

Web Title: The bus is not easy to sit on the night of 'nightfall'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.