Join us

एसटीच्या संपाने खोळंबली बससेवा

By admin | Published: April 30, 2015 11:37 PM

नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांनी छेडलेल्या देशव्यापी संपाचे पडसाद पनवेलमध्येही उमटले.

पनवेल : नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांनी छेडलेल्या देशव्यापी संपाचे पडसाद पनवेलमध्येही उमटले. गुरुवारी सकाळपासून काही प्रवाशांना पनवेलमधील एसटी आगारात ताटकळत उभे राहावे लागले. कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांची सर्वात जास्त गैरसोय झाली. नगर, धुळे याठिकाणी जाणाऱ्या प्रावाशांनाही या आंदोलनाचा फटका बसला.या आंदोलनात काही खाजगी वाहतूक संघटना सहभागी झाल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. पनवेल एसटी डेपोमधून निघणाऱ्या जवळ जवळ ५0 टक्के गाड्या थांबल्या होत्या. १५ ते २0 गाड्या कल्याण आगारात थांबविल्या होत्या. कल्याण आगार यावेळी पूर्णपणे बंद असल्यामुळे अनेक गाड्या रद्दही कराव्या लागल्या. काही प्रवाशांनी पनवेल एसटी आगार प्रमुख राजेंद्र परदेशी यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर त्या प्रवाशांना तिकिटाचा परतावा देण्यात आल्याची माहिती परदेशी यांनी दिली. यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली होती. ११ नंतर संप मागे घेण्याची सूचना पनवेल आगार प्रमुखांना मिळाल्यानंतर बससेवा पूर्ववत करण्यात आली. सकाळी ११ नंतर बससेवा सुरळीत झाली. केवळ २ ते ३ तासांसाठी प्रवाशांची गैरसोय झाली अशी प्रतिक्रि या पनवेल एसटी आगार प्रमुख राजेंद्र परदेशी यांनी दिली. (प्रतिनिधी) महाड एसटी आगार ठप्प४प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅन्ड सेफ्टी बिल २०१४ मधील अन्यायकारक तरतुदीविरुद्ध परिवहन कर्मचारी, कामगार आणि अधिकायांनी पुकारलेल्या गुरु वारच्या बंदला महाड एसटी आगारात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. बुधवारी मध्यरात्री महाड आगारातून एकही एसटी बस सोडण्यात न आल्याने प्रवाशांचे यात अतोनात हाल झाल्याचे दिसून आले.४महाड : महाड एसटी आगारात गुरुवारी सकाळी काम बंद आंदोलनाच्यावेळी अचानक पोलिसांची जीप आगारातील चालक बाबासाहेब महाडिक यांना ताब्यात घेण्याकरिता आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. शांततामय मार्गाने आंदोलन सुरू असताना पोलीस कारवाईसाठी का आले? असा सवाल उपस्थित केला.४दरम्यान, दुपारी तहसीलदार बी.एन.कदम यांच्याकडे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि. ए. बी. पाटील व आत्मदहनाचा इशारा देणारे शेतकरी बाबासाहेब महाडिक, संदेश महाडिक आदिंसह बैठक झाली. पोलीस तत्काळ कारवाई करतील असे आश्वासन बैठकीअंती प्राप्त झाल्यावर महाराष्ट्र दिनी नियोजित आत्मदहन आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.४महाड तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायत हद्दीतील महाडिक यांच्या शेतजमिनीवर वृक्ष लागवडीसाठी खड्डे खणल्याचे दाखवून त्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार बाबासाहेब महाडिक व त्यांच्या नातेवाइकांनी केलेली होती. वनराई संस्थेचे जयवंत देशमुख यांच्यासह गावची पाणलोट समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाडिक यांनी केली होती. कारवाई न झाल्यास १ मे रोजी आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला. ४आज सकाळी ९ वा. आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह बाबासाहेब महाडिक यांना ताब्यात घेण्यासाठी आले त्यावेळी बसस्थानकात गोंधळ निर्माण झाला होता. महाडिक हे महाड आगारात बसचालक म्हणून सेवेत असून त्यांना ताब्यात घेण्यास एसटी कर्मचाऱ्यांनीही पोलिसांना अटकाव केला.