Join us

कामगारांमुळे पडतात बसेस बंद

By admin | Published: June 25, 2014 11:14 PM

ठाणो परिवहन सेवेच्या कोलमडलेल्या स्थितीचे कामगारांवर खापर फोडले

अजित मांडके - ठाणो
ठाणो परिवहन सेवेच्या कोलमडलेल्या स्थितीचे कामगारांवर खापर फोडले जात असताना प्रत्यक्षात ठाणो परिवहन सेवेत निधीचा तुटवडा असल्याने बसेसची दुरुस्ती, टायर नसणो, स्पेअर पार्ट्सचा अभाव, जनरेटर चार महिन्यांपासून बंद, खाजगी कामगारांचा अभाव आदी कारणांमुळे परिवहनचा गाडा कोलमडलेला असल्याची बाब समोर आली आहे. परंतु परिवहन सेवा बंद पडू दिली जाणार नसल्याचा दावा पुन्हा एकदा शिवसेनेने दिला आहे. 
प्रत्यक्षात परिवहनमध्ये सध्या नादुरुस्त अवस्थेत असलेल्या बसेसची संख्या ही 234 च्या घरात गेली असून, या बसेसची दुरुस्ती करण्यासाठी परिवहनकडे निधी नाही. तसेच स्पेअर पार्ट्सचा पुरवठा हा जेमतेम 1क् टक्केच होत आहे. जेएनएनयूआरएमअंतर्गत परिवहनमध्ये असलेल्या 2क्क् पैकी 89 बसेस आजही बंद अवस्थेत आहेत. परिवहनकडे पैसे नसल्याने स्पेअर पार्ट्स पुरविणारी कंपनीने सुध्दा आपले हात आखडते घेतले आहेत. 4 स्पेअर पार्ट्स मागितले की, केवळ एकच स्पेअर पार्ट दिला जातो. विशेष म्हणजे जनरेटर 4 महिने बंद असल्याने वीज गेल्यावर बसेसची दुरुस्ती होत नाही. वर्कशॉपचे कंत्रटी कामगार बंद झाले आहेत. कामगार भरती नाही़ जे कामगार आहेत ते तीन पाळीत विभागल्याने कर्मचा:यांचा तुटवडा जाणवत आहे. विशेष म्हणजे इंजीनअभावी 2क्क्8 ते 2क्14 या कालावधीत 95 बसेस बंद अवस्थेत आहेत. त्यात इंजीन आहे, पण इतर सामान नसल्याने 7 बसेस बंद आहेत. किरकोळ सामान नसल्याने 15 बसेस बंद आहेत. यातील सहा बसेसच्या काचा फुटल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स नामफलक बंद, पंक्चर काढण्याचा ज्ॉक तुटलेला आह़े एका गाडीला सहा सिगारकॉइल लागतात. 3क्क् सिगारकॉइलची मागणी असताना 3क् देण्यात आल्या आहेत. मागणी करण्यात आलेले 422 पैकी एकही टायर अद्याप उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सुद्धा बसेस बंद अवस्थेत आहेत. टायर नसल्याने गाडी पंक्चर झाली की बंद बससेच टायर काढून पंक्चर बसला लावतात. त्यातही ऑइल दिवसाला पाच लिटर लागते. परंतु प्रत्यक्षात पैशांच्या उपलब्धतेवर 1क्क् मिली लीटर ऑइलच्या छोटय़ा बाटल्या विकत घेतल्या जात आहेत.
 
1या सर्व बाबींमुळे बसेसचे मेटेनन्स होत नसल्याचेही दिसत आहे. एकूणच परिवहन सेवा पुन्हा सुस्थितीत आणावी यासाठी टीएमटी बचाव कृती समितीने आता शिवसेनेला साकडे घातले असून, त्यांनी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी भेट घेतली आहे.
2त्यानुसार परिवहन सेवेतील बसेसची तातडीने दुरुस्ती होऊन त्या नागरिकांना उपलब्ध व्हाव्या व नागरिकांना चांगली परिवहन सुविधा मिळावा यासाठी सक्षमपणो निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही म्हस्के यांनी दिली. तसेच येत्या दोन दिवसांत टीएमटीसंदर्भात महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. 
 
च्ठाणो परिवहन बेस्टमध्ये विलीन करा, या मागणीचा जोर वाढू लागल्यानंतर परिवहनची सध्याची स्थिती कशी आहे याचा लेखाजोखाच ‘लोकमत’मध्ये काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता.
 
च्त्यानंतर आता परिवहनला सावरण्यासाठी पुन्हा एकदा संघटना आणि शिवसेना सुद्धा पुढे सरसावली आहे. परंतु प्रत्यक्षात टीएमटीची सध्या स्थिती ही केविलवाणीच असल्याचे आणखी एका माहितीवरून उघड झाले आहे. परंतु याचे सर्व खापर कर्मचा:यांवर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.