‘बिझनेस हब’ अन् महाराष्ट्राची राजधानी सर्वाधिक प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 03:59 AM2019-12-23T03:59:09+5:302019-12-23T03:59:55+5:30

बीकेसीत हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण अधिक : वाहनांच्या वाढत्या संख्येचाही परिणाम

The 'Business Hub' most polluted like new delhi | ‘बिझनेस हब’ अन् महाराष्ट्राची राजधानी सर्वाधिक प्रदूषित

‘बिझनेस हब’ अन् महाराष्ट्राची राजधानी सर्वाधिक प्रदूषित

Next

फोटो सौजन्य- फ्रायडे फॉर फ्युचर मुंबई

मुंबई : दिल्लीप्रमाणेच मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारखी मोठी शहरे प्रदूषित होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील ‘बिझनेस हब’ म्हणून ओळखले जाणारे वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. हवेची गुणवत्ता नोंदवित असलेल्या ‘सफर’ या संकेतस्थळावर प्रदूषणाचे मोजमाप केले जाते. या संकेतस्थळावरील नोंदीनुसार, १ ते २२ डिसेंबर या कालावधीत मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण २ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले होते. वांद्रे-कुर्ला संकुलाचा विचार करता या काळात बीकेसीमधील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण १७ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले; आणि ३ वेळा ३०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले.

मुंबईतच दररोज ५००हून जास्त नव्या वाहनांची भर पडत असून, याव्यतिरिक्त छोट्या-मोठ्या कारखान्यांतून सोडले जाणारे वायू हवा प्रदूषित करीत आहे. मुंबई शहरात माझगाव, पूर्व उपनगरात चेंबूर आणि पश्चिम उपनगरात वांद्रे-कुर्ला संकुलाला लागून अंधेरी परिसरात मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषणाची नोंद सातत्याने ‘सफर’ या प्रदूषणविषयक संकेतस्थळावर होत आहे. सातत्याने सुरू असलेली बांधकामे, कारखाने, खाणकामे हे घटक हवेतील धूलिकणांमध्ये भर घालतात. केवळ हेच घटक नाहीत, तर वाहनांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणारे प्रदूषणही वातावरण आणखी वाईट करत आहे.

ठिकाणांवरील हवेची गुणवत्ता (पार्टिक्युलेट मॅटरमध्ये)
बीकेसी ३०२
अत्यंत वाईट
बोरीवली २४८ वाईट
मालाड २०६ वाईट
भांडुप ७७ समाधानकारक
अंधेरी २१८ वाईट
वरळी १९२ मध्यम
चेंबूर २०२ वाईट
माझगाव २५२ वाईट
कुलाबा १२७ मध्यम
नवी मुंबई २९३ वाईट

शहरांची हवेची गुणवत्ता (पार्टिक्युलेट मॅटरमध्ये)
पुणे १४३
मुंबई २१२
दिल्ली ३२७
अहमदाबाद १५३

Web Title: The 'Business Hub' most polluted like new delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.