Join us

‘बिझनेस हब’ अन् महाराष्ट्राची राजधानी सर्वाधिक प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 3:59 AM

बीकेसीत हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण अधिक : वाहनांच्या वाढत्या संख्येचाही परिणाम

फोटो सौजन्य- फ्रायडे फॉर फ्युचर मुंबईमुंबई : दिल्लीप्रमाणेच मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारखी मोठी शहरे प्रदूषित होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील ‘बिझनेस हब’ म्हणून ओळखले जाणारे वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. हवेची गुणवत्ता नोंदवित असलेल्या ‘सफर’ या संकेतस्थळावर प्रदूषणाचे मोजमाप केले जाते. या संकेतस्थळावरील नोंदीनुसार, १ ते २२ डिसेंबर या कालावधीत मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण २ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले होते. वांद्रे-कुर्ला संकुलाचा विचार करता या काळात बीकेसीमधील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण १७ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले; आणि ३ वेळा ३०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले.

मुंबईतच दररोज ५००हून जास्त नव्या वाहनांची भर पडत असून, याव्यतिरिक्त छोट्या-मोठ्या कारखान्यांतून सोडले जाणारे वायू हवा प्रदूषित करीत आहे. मुंबई शहरात माझगाव, पूर्व उपनगरात चेंबूर आणि पश्चिम उपनगरात वांद्रे-कुर्ला संकुलाला लागून अंधेरी परिसरात मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषणाची नोंद सातत्याने ‘सफर’ या प्रदूषणविषयक संकेतस्थळावर होत आहे. सातत्याने सुरू असलेली बांधकामे, कारखाने, खाणकामे हे घटक हवेतील धूलिकणांमध्ये भर घालतात. केवळ हेच घटक नाहीत, तर वाहनांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणारे प्रदूषणही वातावरण आणखी वाईट करत आहे.ठिकाणांवरील हवेची गुणवत्ता (पार्टिक्युलेट मॅटरमध्ये)बीकेसी ३०२अत्यंत वाईटबोरीवली २४८ वाईटमालाड २०६ वाईटभांडुप ७७ समाधानकारकअंधेरी २१८ वाईटवरळी १९२ मध्यमचेंबूर २०२ वाईटमाझगाव २५२ वाईटकुलाबा १२७ मध्यमनवी मुंबई २९३ वाईटशहरांची हवेची गुणवत्ता (पार्टिक्युलेट मॅटरमध्ये)पुणे १४३मुंबई २१२दिल्ली ३२७अहमदाबाद १५३

टॅग्स :मुंबईप्रदूषण