मुंबईतील व्यापाऱ्याला गंडा
By admin | Published: December 26, 2016 04:19 AM2016-12-26T04:19:39+5:302016-12-26T04:19:39+5:30
एकीकडे नव्या नोटा पकडल्या जात असतानाच दुसरीकडे त्या बदलण्यासाठी आलेल्या मुंबईतील अनुप परमार (२७, रा. मशीदबंदर, मुंबई) या व्यापाऱ्याला
कल्याण : एकीकडे नव्या नोटा पकडल्या जात असतानाच दुसरीकडे त्या बदलण्यासाठी आलेल्या मुंबईतील अनुप परमार (२७, रा. मशीदबंदर, मुंबई) या व्यापाऱ्याला १३ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बलवीरसिंग भवरसिंग (रा. राजस्थान) आणि सागर भदोरिया (रा. काळातलाव परिसर, कल्याण) यांच्यावर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
परमार यांच्याशी भवरसिंग आणि भरोदिया यांनी संपर्क साधला. तुमच्याजवळील जुन्या चलनी नोटांच्या किमतीत १३ लाखांच्या नव्या चलनी नोटा किंवा अर्धा किलो वजनाचे सोने देतो, असे प्रलोभन दाखवले. त्यानुसार, १३ नोव्हेंबरला दुपारी दीडच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता रोडवरील एका बँकेसमोर थांबून परमार यांच्याजवळील १३ लाखांच्या जुन्या चलनी नोटा ताब्यात घेतल्या. मात्र, महिनाभराहून अधिक कालावधी उलटूनही ठरल्याप्रमाणे आपले पैसे न मिळाल्याने परमार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार दिली. (प्रतिनिधी)