व्यावसायिकाला १ कोटीच्या खंडणीसाठी धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:06 AM2021-03-16T04:06:55+5:302021-03-16T04:06:55+5:30
मुंबई : कांदिवलीतील इंटरनेट सर्व्हिसचा व्यवसाय करणाऱ्या ४४ वर्षीय व्यावसायिकाकडे एक कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आली. तसेच पैसे न ...
मुंबई : कांदिवलीतील इंटरनेट सर्व्हिसचा व्यवसाय करणाऱ्या ४४ वर्षीय व्यावसायिकाकडे एक कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आली. तसेच पैसे न दिल्यास मुलांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. गेल्या आठवड्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानुसार कांदिवली पोलीस अधिक तपास करत आहेत.
सोनसाखळी चोरी; गुन्हा दाखल
मुंबई : सायन कोळीवाडा परिसरातून जात असलेल्या ४३ वर्षीय महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरट्याने पळ काढल्याची घटना नुकतीच समोर आली. यावेळी ४ तोळ्यांची सोनसाखळी चाेरट्याने पळवली. याप्रकरणी अँटाॅप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.......................
ओशिवरा येथे फिनेल पाजून चोरी
मुंबई : ओशिवरा परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला फिनेल पाजून त्याच्याकडील ११ हजार रुपये लांबविण्यात आल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाने तक्रार दिली असून, पाेलीस अधिक चाैकशी करत आहेत.
...........................