देशातील व्यापाऱ्यांनी जीएसटी विधेयक स्वीकारावे

By Admin | Published: June 28, 2017 03:35 AM2017-06-28T03:35:57+5:302017-06-28T03:35:57+5:30

देशातील व्यापाऱ्यांनी वस्तू कर विधेयक (जीएसटी) विधेयकास घाबरू नये तर या बदलाचा स्वीकार करावा, देशाची अर्थव्यवस्था

Businessmen of India accept GST Bill | देशातील व्यापाऱ्यांनी जीएसटी विधेयक स्वीकारावे

देशातील व्यापाऱ्यांनी जीएसटी विधेयक स्वीकारावे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील व्यापाऱ्यांनी वस्तू कर विधेयक (जीएसटी) विधेयकास घाबरू नये तर या बदलाचा स्वीकार करावा, देशाची अर्थव्यवस्था व व्यापाऱ्यांच्या पारदर्शक कारभारासाठी या विधेयकाची मदत होईल, असे मत टॅली सोल्यूशन्स या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भरत गोएंका यांनी शुक्रवारी मांडले. ते वस्तू कर विधेयक अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका बैठकीत बोलत होते.
केंद्र सरकार येत्या १ जुलैपासून जीएसटी विधेयक अमलात आणणार आहे. जीएसटी विधेयकामुळे व्यापाऱ्यांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच जीएसटी विधेयक लागू झाल्यावर बाजारात आपला निभाव कसा लागणार, असा गोंधळरूपी
प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. दरम्यान, टॅली सोल्यूशन्स या कंपनीने देशातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचा ताळेबंद नोंदविण्यासाठी टॅली सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. त्याचे जीएसटी विधेयक असलेले अपडेट नुकतेज रीलीज करण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर जुन्या ग्राहकांसाठी मोफत असून नवीन ग्राहकांसाठी ते माफक दरात उपलब्ध आहे.
जीएसटी विधेयक लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना या विधेयकाचे आकलन होण्यासाठी टॅलीकडून दररोज १५ मार्गदर्शक शिबिरे आयोजित केली जातात. जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना जीएसटीचे परिपूर्ण ज्ञान देण्याकडे कंपनीचा कल असेल, असेही गोएंका यांनी स्पष्ट केले.

Web Title: Businessmen of India accept GST Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.