नवोदित खेळाडूंची फसवणूक करणा-या टोळीचा पर्दाफाश  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 04:57 AM2017-12-02T04:57:04+5:302017-12-02T04:57:23+5:30

आयपीएल तसेच देशाअंतर्गत आणि परदेशातील क्रिकेट लीगमध्ये संधी देण्याचे आमिष दाखवून नवोदित खेळाडूंची फसवणूक करणाºया टोळीचा मुख्य सुत्रधार आर. एन. स्पोर्ट क्लबचा मालक वी. बरातेसह जीवन मगदुम, नीलेश मोरेला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

 Busted gang of budding players cheated | नवोदित खेळाडूंची फसवणूक करणा-या टोळीचा पर्दाफाश  

नवोदित खेळाडूंची फसवणूक करणा-या टोळीचा पर्दाफाश  

Next

मुंबई : आयपीएल तसेच देशाअंतर्गत आणि परदेशातील क्रिकेट लीगमध्ये संधी देण्याचे आमिष दाखवून नवोदित खेळाडूंची फसवणूक करणाºया टोळीचा मुख्य सुत्रधार आर. एन. स्पोर्ट क्लबचा मालक वी. बरातेसह जीवन मगदुम, नीलेश मोरेला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
हैदराबाद सनरायझर फ्रेन्चायझीने २०१२ मध्ये बरातेला करारबद्ध केले होते. मात्र, त्यानंतर त्याचा हा करार रद्द करण्यात आला. तरीदेखील बराते सनरायझरचा सदस्य असल्याचे भासवत होता. मुंबईसह देशभरातील लहान मुलांचे क्रिकेट प्रशिक्षण शिबिर तो घेत असे. तेथील प्रशिक्षकांना इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल), रणजी ट्रॉफी तसेच परदेशातील ईस्ट आफ्रिका प्रिमियर लीग (ईएपीएल) मध्ये संधी मिळवून देण्याचे अमिष दाखवत असे.
आझाद मैदान येथील प्रशिक्षण केंद्राच्या अधिकारीचीही २०१३ मध्ये बराते सोबत ओळख झाली होती. त्यांनाही बोलण्यात गुंतवून त्याने आपल्या जाळ्यात ओढले. येथील खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी देण्यासंदर्भात मेल पाठवला. तसेच सनरायझर्स हैदराबाद (आयपीएल) संघाचा लोगो, आर. एन. स्पोर्टस क्लबचे पोस्टर्स, छापील पत्रे लेटर हेडवर छापून ते आयपीएलमधील हैदराबाद सनरायझर्ससोबत संलग्न असल्याचे भासवले. याच कागदपत्रांच्या आधारे आॅगस्ट २०१३ ते डिसेंबर २०१४ पर्यंत येथील नवोदित खेळाडूंची ६८ लाख ६ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तक्रारदारांनी चेंबूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र चेंबूर पोलिसांनी दखल घेतली नाही.
अखेर तक्रारदारांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आणि शुक्रवारी बरातेसह तिघांना बेड्या ठोकल्या. बरातेला भुसावळमधून अटक करण्यात आली आहे. अशात बरातेविरुद्ध तक्रार दिल्यास क्रिकेटमधील भवितव्य धोक्यात येईल या भीतीमुळे अजूनही काही खेळाडू गप्प बसले असल्याची माहितीही तपासात उघड झाली आहे. बरातेला ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 

Web Title:  Busted gang of budding players cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.