Join us

आरेच्या फुलपाखरू उद्यानात विविध जातींची फुलपाखरे ठरतात पर्यटकांचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 9:08 PM

Aarey's butterfly garden : गोरेगाव पूर्व येथील संदीप आठल्ये यांनी पर्यावरण प्रेमी असलेल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चक्क गोरेगाव पूर्व येथील निसर्गरम्य आरेच्या दुग्ध शाळे समोरील 2 एकर जागेत मोहक फुलपाखरू उद्यान 8 मे 2016 विकसीत केले आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - आज जागतिक फुलपाखरू दिवस आहे. वडीलांच्या आठवणी म्हणून त्यांच्या नावे स्मृतीस्तंभ अनेक जण उभारतात. 2015 पूर्वी ओसाड असलेल्या  गोरेगाव पूर्व येथील संदीप आठल्ये यांनी पर्यावरण प्रेमी असलेल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चक्क गोरेगाव पूर्व येथील निसर्गरम्य आरेच्या दुग्ध शाळे समोरील 2 एकर जागेत मोहक फुलपाखरू उद्यान 8 मे 2016 विकसीत केले आहे.सकाळी येथे फुलपाखरांचा मोठा राबता असतो आणि खास त्यांच्य साठी येथे वृक्षलागवड केली जाते. येथे बटरफ्लाय वॉक तयार केला असून येथे सुमारे 100 हून विविध जातींची फुलपाखरू असून देशी व विदेशी पर्यटक आवर्जून येथे येतात. येथे फुलपाखरां विषयी सविस्तर माहिती पर्यटकांना दिली  जाते. (Butterflies of different species are a tourist attraction in Aarey's butterfly garden)

वडिल दिवंगत विनय आठल्ये यांनी काही वर्षांपूर्वी आरे कॉलनीत एक निसर्ग उत्साही पर्यावरण प्रेमी म्हणून 3500 पेक्षा जास्त झाडे लावली होती.2015 साली वडिलांच्या निधनानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आणि फुलपाखरू बागेत संशोधन करण्यास सुरवात केली. आरे दुग्धशाळेजवळ फुलपाखरू उद्यान करण्यासाठी झाडे लावणे. आरंभ करण्यापूर्वी  संशोधन केले आणि आरे दुग्ध कॉलनी परिसरातील आणि त्या आसपासच्या फुलपाखरांविषयी विविध अहवालांचा अभ्यास केला अशी माहिती संदीप आठल्ये यांनी लोकमतला दिली.

या उपक्रमाबद्दल बोलताना संदीप आठल्ये म्हणाले की, “माझ्या वडिलांनी येथे मोठ्या प्रमाणत वृक्ष लावले आणि येथे फुलपाखरू बाग तयार करायची इच्छा होती. 2016 साली त्यांचे निधन झाल्यानंतर सुमारे 2 एकर जागेत मोहक फुलपाखरू उद्यान साकारून  वडिलांचे स्वप्न साकार केले.  आतापर्यंत विविध प्रकारची सुमारे 70 अमृत वनस्पतींची लागवड केली आहे. अमृत ​​वनस्पती फुलपाखरे आकर्षित करतात. या उपक्रमासाठी बर्‍याच लोकांनी त्यांच्या सूचना दिल्या. आम्ही आरे कॉलनी आणि संजय गांधी नॅशनल पार्क (एसजीएनपी) संबंधित पुस्तकांचा अभ्यास केला. हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आम्ही एसजीएनपी आणि भवन्स कॉलेज अंधेरीची  फुलपाखरू बाग बघितले. 

ऑनलाइन संशोधनानुसार आरे कॉलनीत  100 प्रकारची फुलपाखरे आहेत तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 160 हुन अधिक फुलपाखरे आहेत. सदर फुलपाखरू उद्यानात विकसित करण्यासाठी आई -आरती आठल्ये,पत्नी- वरदायिनी आठल्ये,मुलगा - मल्हार आठल्ये आदींचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याची माहिती त्यांनी दिली.

आरे दुग्ध कॉलनीचे माजी सीईओ गजानन राऊत यांनीही या उपक्रमाचे समर्थन केले होते. राऊत म्हणाले, “हा उपक्रम फुलपाखरू आणि इतर पक्ष्यांच्या विविध प्रजाती आकर्षित करण्यास मदत करेल. पुढच्या टप्प्यात आम्ही फुलपाखरे आकर्षित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या यजमान वनस्पतींची लागवड करण्याचे ठरवले.त्यानंतर येथे अनेक वेळा वृक्षारोपण करण्यात आले आणि या प्रकल्पात स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी अनेक नागरिक पुढे आले आहेत. आतापर्यंत सुमारे 5000 हुन अधिक देशी व विदेशी नागरिकांनी या फुलपाखरू उद्यानाला भेट दिली आहे असे त्यांनी संगितले. 

टॅग्स :मुंबईनिसर्ग