Join us

देशभरातील फुलपाखरांचे आता हिंदीत होणार बारसे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:43 AM

देशभरातील फुलपाखरांच्या प्रजातींची माहिती आता मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही मिळणार आहे.

मुंबई : देशभरातील फुलपाखरांच्या प्रजातींची माहिती आता मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही मिळणार आहे. देशभरातील फुलपाखरू निरीक्षणात सहभाग घेणाऱ्या विविध संस्थांच्या पुढाकाराने राष्ट्रीय तितली नामकरण सभा समूहाची निर्मिती करण्यात आली आहे. 

पहिल्या टप्प्यात त्यांनी २२१ प्रजातींचे नामकरण केले आहे. हिंदी भाषेतील फुलपाखरांच्या नावांकरिता फुलपाखरू अभ्यासक दिवाकर ठोंबरे यांनी पुढाकार घेतला. 

इतर प्रादेशिक भाषांतही प्रयोग -

१)  पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध होताच एकूण १ हजार ४०० फुलपाखरांची यादी हिंदीत येण्यासाठी काम केले जाईल.

२)  मराठी, मल्याळी भाषेत फुलपाखरांची नावे असून, हिंदीतही हा प्रयोग होत आहे. इतर प्रादेशिक भाषांतही हा प्रयोग केला जाईल.

३)  फुलपाखरांच्या नावांकरिता पौराणिक आणि सांस्कृतिक संदर्भही घेतले आहेत.

४)  हिंदीमधील नावांसाठी मराठीप्रमाणे निकष वापरले जात आहेत.

मराठीप्रमाणेच हिंदी नावे मिळणार : राष्ट्रीय तितली नामकरण समितीची निर्मिती 

१)  पर्यावरण अभ्यासक आनंद पेंढारकर, कृष्णमेघ कुंटे, मनीष कुमार, धारा ठक्कर, रतींद्र पांडे, रूपक डे आदी अभ्यासक सहा महिन्यांपासून फुलपाखरांच्या हिंदी नावासाठी काम करत आहेत.

माहीमच्या उद्यानात ४० प्रकारची फुलपाखरे -

१)  जागतिक फुलपाखरू दिन १४ मार्च रोजी साजरा केला जातो. 

२)  जगभरात फुलपाखरांच्या एकूण २० हजारांहून अधिक प्रजाती आहेत. यामधील सुमारे १ हजार ३७९ प्रजाती भारतात आढळतात.

३)  माहीम येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानात सर्वसाधारण ४० प्रकाराची फुलपाखरे दिसतात.

४)  महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून ब्ल्यू मॉरमॉन म्हणजेच नीलवंत.

 ब्ल्यू टायगर फुलपाखरांचे पंख काळ्या किंवा गडद तपकिरी रंगाचे असतात आणि या पंखांच्या वरच्या बाजूस हलक्या निळ्या रंगाचे लंबगोलागार पट्टे आणि ठिपके असतात. नर फुलपाखरे ही मादीपेक्षा आकाराने लहान असतात. जगामध्ये फुलपाखरांच्या एकूण २०,००० प्रजाती आहेत, त्यातील १३७९ प्रजाती ह्या भारतात आढळतात.   

टॅग्स :मुंबईहिंदी