मुंबईत फ्लॅट घेताय? एजंटकडे ‘रेरा’ प्रमाणपत्र आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:52 AM2023-11-29T09:52:10+5:302023-11-29T09:59:09+5:30

प्लॉट, फ्लॅट विकणाऱ्या एजंटांकडे ‘रेरा’चे प्रमाणपत्र असणे बंधनकारक.

Buying a flat in Mumbai Does the agent have RERA certificate know about this | मुंबईत फ्लॅट घेताय? एजंटकडे ‘रेरा’ प्रमाणपत्र आहे का?

मुंबईत फ्लॅट घेताय? एजंटकडे ‘रेरा’ प्रमाणपत्र आहे का?

मुंबई : गृहनिर्माण क्षेत्रातील एजंट हा घर खरेदीदार आणि बिल्डर यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. बहुतेक वेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटच्या संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन रेरा कायद्यामध्येही त्याचे अस्तित्व अधोरेखित करण्यात आले असून, प्लॉट,फ्लॅट विकणाऱ्या एजंटांकडे ‘रेरा’चे प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कारवाई टाळण्यासाठी काय कराल...

  प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रमाणपत्राशिवाय महारेराकडे एजंट म्हणून नोंदणी किंवा नूतनीकरण करता येत नाही.


  जुने एजंट आणि बिल्डरकडील संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र मिळवून त्यांच्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे. पालन न करणाऱ्यांवर महारेरा कारवाई करणार आहे.

  महारेराकडे एजंट म्हणून नव्याने नोंदणी करण्यासाठी किंवा असलेल्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी प्रमाणपत्र प्राप्त करणे आता बंधनकारक राहील. त्यानंतर हे प्रमाणपत्र असल्याशिवाय नवीन एजंट म्हणून नोंदणी किंवा नूतनीकरणही होणार नाही.

  सध्याच्या परवानाधारक एजंटना आणि बिल्डरकडील या कामांशी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र मिळवून त्यांच्या संकेतस्थळावर त्यांनी नोंदवणे आवश्यक आहे.

  बिल्डरच्या स्वयंविनियामक संस्थांसोबत इतर संस्थांनीही या अनुषंगाने अनेक प्रबोधनपर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले होते. या कार्यक्रमांना महारेरातील वरिष्ठांसोबतच या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही हजर राहून मार्गदर्शन केले आहे.

एजंटना रेरा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात.ज्यात बिल्डर आणि प्रकल्प याची विश्वासार्ह प्राथमिक माहिती, प्रकल्पाच्या जमिनीच्या हक्काची वैधता, रेरा नियमानुसार चटई क्षेत्र, इमारतीच्या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या तत्सम मंजुऱ्या, प्रकल्पाच्या विरुद्ध असल्यास, संबंधित बिल्डरची आर्थिक क्षमता याबाबी कशा मिळवायच्या, समजून घ्यायच्या, हे त्यांना माहीत असायला हवे.

एजंटकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार, घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र, दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी.एजंटकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने एजंटने प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक.

Web Title: Buying a flat in Mumbai Does the agent have RERA certificate know about this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई