Join us

चलन बदलाचा फटका गृह खरेदीला

By admin | Published: November 12, 2016 6:00 AM

चलन बदल आणि बँकेतून पैसे काढण्यावर घातलेल्या निर्बंधामुळे गृह खरेदीला फटका बसला आहे. अवघ्या चार दिवसांत घरांच्या किंमती १० टक्क्यांनी घसरल्या असून सुमारे ४०

मुंबई : चलन बदल आणि बँकेतून पैसे काढण्यावर घातलेल्या निर्बंधामुळे गृह खरेदीला फटका बसला आहे. अवघ्या चार दिवसांत घरांच्या किंमती १० टक्क्यांनी घसरल्या असून सुमारे ४० टक्क्यांनी खरेदी घटल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे कार्यकारिणी सदस्य अशोक गुप्ता यांनी सांगितले.गुप्ता म्हणाले की, याआधी घर खरेदी करताना कर वाचवण्यासाठी खरेदीदार केवळ ६० टक्के रक्कमेवरच कर भरणा करायचे. याउलट ४० टक्के रक्कमेचा व्यवहार शासनापासून दडवला जायचा. मात्र सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे १०० टक्के रक्कम ही शासनाला दाखवावी लागेल. त्यामुळे घरांच्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे. मात्र पुढील दोन महिने बाजारात पैशांची चणचण निर्माण होणार असल्याने घरांच्या किंमती घसरतील. मात्र दोन महिन्यांनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलेल. बाजारात पैसा उपलब्ध झाल्यानंतर घरांच्या किंमतीत झपाट्याने वाढ होईल. मात्र तोपर्यंत विकासकांना प्रचंड तोटा सहन करावा लागेल.सध्याची परिस्थिती पाहता बांधकाम विकासक मुद्दलच्या भावात घर विक्री करतील, अशी माहिती नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिक प्रकाश बाविस्कर यांनी दिली. ते म्हणाले की, गृह खरेदीसाठी सोने हा पर्याय होऊ शकत नाही. मात्र बँकांकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. घरांच्या किंमती कोसळल्याने कर्ज काढून मोठ्या संख्येने लोक घरे खरेदी करतील. (प्रतिनिधी)