आंबे खरेदी करताय; जरा जपून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 02:58 AM2018-04-01T02:58:18+5:302018-04-01T02:58:18+5:30

मुंबईच्या बाजारपेठांत हापूस, बदामी, पायरी असे विविध प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. त्यांना ग्राहक पसंतीही आहे. मात्र, आंबे खरेदी करताना हापूसच्या नावाखाली आपल्या पदरात दुसऱ्याच प्रजातीचा आंबा पडून फसवणूक तर होत नाही ना?

 Buying mangoes; Just look ... | आंबे खरेदी करताय; जरा जपून...

आंबे खरेदी करताय; जरा जपून...

googlenewsNext

- कुलदीप घायवट

मुंबई : मुंबईच्या बाजारपेठांत हापूस, बदामी, पायरी असे विविध प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. त्यांना ग्राहक पसंतीही आहे. मात्र, आंबे खरेदी करताना हापूसच्या नावाखाली आपल्या पदरात दुसऱ्याच प्रजातीचा आंबा पडून फसवणूक तर होत नाही ना? याची खबरदारी घेण्याचे आवाहन कंझ्युमर गाइडन्स सोसायटी आॅफ इंडियाने केले आहे.
कोकणातला हापूस आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची नेहमीच झुंबड दिसते. वाढती मागणी पाहून हापूससारख्या दिसणाºया तत्सम आंब्यांची भेसळ करून चढ्या दराने ते विकले जातात. त्यामुळे आंबे खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
अन्न सुरक्षा कायदा कोणत्याही प्रजातींचा आंबा दुय्यम मानत नाही किंवा फरक करत नाही, असे अन्न आणि औषध प्रशासन आणि कंझ्युमर गाइडन्स सोसायटी आॅफ इंडियाकडून सांगण्यात आले. आंबे खरेदी करताना फसवणूक झाल्यास योग्य पुराव्यासह ग्राहक आपली तक्रार ग्राहक मंचाकडे करू शकतात, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

पारख करून खरेदी करा
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून हापूस, तर दक्षिण भारतातील केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतून हापूसबरोबरच लालबाग, बदामी, तोतापुरी या प्रकारचे आंबे मुंबईत दाखल झाले आहेत.

कोकणचा हापूस ओळखायचा कसा?
कोकणचा हापूस आंबा गडद केसरी रंगाचा, चवीला अत्यंत गोड असतो. आंब्याची साल
पातळ असते.
याउलट कर्नाटकचा हापूस आंबा पिवळ्या रंगाचा आणि चवीला गोड आणि तुरकट असतो. कर्नाटकच्या आंब्याची साल जाड असते, अशी माहिती आंबा व्यापाºयांनी दिली.
आंब्यांचा प्रकार हा चव, आकार, रंग यावरून ठरवला जातो. मात्र, यावरून तो आंबा कोणत्या प्रदेशातील आहे हे ठरवता येऊ शकत नाही. त्यामुळे आंब्याची विशेष पारख असलेल्या व्यक्तीकडूनच आंबे खरेदी करण्यात यावेत.
आंबे खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक झाली असता पुराव्याअभावी ग्राहक तक्रार करू शकत नाही, असे कंझ्युमर गाइडन्स सोसायटी आॅफ इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकºयांना आंबा पिकवण्यासाठी, त्यांचा माल बाजारात लवकर विकला जावा यासाठी शेती विभागाकडून अन्न सुरक्षा कायद्याचे बरेच नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे आंबा पिकवण्यासाठी इथिलीन गॅसचा वापर करण्यास मुभा आहे. मात्र, आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड या केमिकलचा वापर करण्यास अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.
- चंद्रशेखर साळुंखे, संयुक्त आयुक्त,
अन्न आणि औषध प्रशासन.

Web Title:  Buying mangoes; Just look ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई