मुंबईत बोचरे वारे; तापमान @ १५.६
By admin | Published: December 18, 2015 03:20 AM2015-12-18T03:20:36+5:302015-12-18T03:20:36+5:30
गुरुवारी मुंबई शहराचे किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. या मौसमात नोंदविण्यात आलेले आतापर्यंतचे हे सर्वांत कमी किमान तापमान
Next
मुंबई : गुरुवारी मुंबई शहराचे किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. या मौसमात नोंदविण्यात आलेले आतापर्यंतचे हे सर्वांत कमी किमान तापमान असून, घटत्या किमान तापमानामुळे मुंबईकरांना थंडीचे बोचरे वारे अधिकच झोंबू लागले आहेत.
सांताक्रुझ वेधशाळेत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०.७, १५.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे; तर कुलाबा वेधशाळेत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९, २०.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मंगळवारसह बुधवारी मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात सरासरी तीनएक अंशाची वाढ नोंदविण्यात आली होती. परिणामी, थंडीचा जोर काहीसा ओसरला होता. परंतु आता पुन्हा शहराच्या कमाल आणि किमान तापमानात घट नोंदविण्यात आली आहे.