२०२४ पर्यंत बेस्टच्या ५४१ बस होणार कालबाह्य; नवीन बससाठी प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 02:54 PM2023-06-14T14:54:52+5:302023-06-14T14:54:57+5:30

बेस्टच्या ताफ्यात एकूण ९०० डबलडेकर एसी बस येणार

By 2024 541 BEST buses will be obsolete Trying for a new buses | २०२४ पर्यंत बेस्टच्या ५४१ बस होणार कालबाह्य; नवीन बससाठी प्रयत्न सुरू

२०२४ पर्यंत बेस्टच्या ५४१ बस होणार कालबाह्य; नवीन बससाठी प्रयत्न सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईकरांना दर्जेदार आणि आरामदायी सेवा देणारी बेस्ट उपक्रम नवीन बस ताफ्यात आणणार असून जुन्या गाड्या लवकरच उपक्रमातून बाहेर काढणार आहे. २०२४ पर्यंत बेस्टच्या ताफ्यातून ५४१ बस हद्दपार होणार आहेत. नवीन बस आणण्यासाठी बेस्टचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईकरांचा प्रतिसाद- मुंबईकरांच्या सोयीसाठी बेस्टने अधिकाधिक एसी बस उतरविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मोठ्या आकाराच्या सिंगल डेकर, मिडी आणि डबल डेकर बसचा समावेश आहे. किफायतशीर तिकीट दर असल्याने एसी बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बेस्ट २०२४ पर्यंत बेस्ट ५ हजारांपेक्षा जास्त एसी बस घेणार आहे.

बस येण्याचा मार्ग मोकळा- दोन हजार १०० इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्याच्या निविदा बोलीतून अपात्र ठरविण्याच्या बेस्ट उपक्रमाच्या निर्णयाला टाटा मोटर्सने सर्वोच्च न्यायालयात दिलेले आव्हान नुकतेच फेटाळल्याने या बस येण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. प्रवाशांसाठी १५० मिडी एसी बसही दाखल करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. 

२०० बसची गरज- बेस्टच्या ताफ्यात ३,३६७ किंवा त्यापेक्षा जास्त बस असणे आवश्यक असून सध्या ३,१६७ बस ताफ्यात आहेत. त्यामुळे २०० बसची गरज आहे. यापैकी ५४१ बस मार्च २०२४ पर्यंत कालबाह्य होणार आहेत.

बसथांब्यावर गर्दी- बेस्टला ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडच्या २१०० इलेक्ट्रिक एसी सिंगल डेकर बसचीही प्रतीक्षा आहे, तर सीएनजीवर धावणाऱ्या २०० सिंगल डेकर बस सेवेत आलेल्या नाहीत. यामुळे प्रवाशांना बस थांब्यावर ताटकळत थांबावे लागते.

९०० डबलडेकर- बेस्टच्या ताफ्यात एकूण ९०० डबलडेकर एसी बस येणार आहेत. यापैकी एका कंपनीकडून २०० पैकी १२ बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत; परंतु यातील ४ बसच सध्या सेवेत आहेत. उर्वरित बस ताफ्यात आणण्यासाठी कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. 

Web Title: By 2024 541 BEST buses will be obsolete Trying for a new buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट