Join us

2030 पर्यंत मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरा बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 10:31 AM

१४मेट्रो एक या मार्गावर मेट्रो धावत आहे तर मेट्रो तीनसाठी वेगळे कॉर्पोरेशन आहे.

- विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

पायाभूत सेवा- सुविधांचा विकास करणे हे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) केले जाते. विभागीय विकास करणे आणि पायाभूत सेवा- सुविधांचे जाळे वाढवणे यावर आम्ही भर देतो. याच माध्यमातून रस्ते वाहतुकीचे जाळे बळकट करतानाच १४ मेट्रोच्या माध्यमातून ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग उभारून प्रदेशाचा चेहरा बदलणे हेच व्हिजन आहे. 

१४मेट्रो एक या मार्गावर मेट्रो धावत आहे तर मेट्रो तीनसाठी वेगळे कॉर्पोरेशन आहे. माझ्याकडे सहा, नऊ, १० आणि १२ मेट्रोलाईन प्रकल्प आहेत. मेट्रो सहा ही स्वामी समर्थनगरपासून विकोळीपर्यंत आहे. मेट्रो नऊ ही दहिसरपासून मीरा भाईंदरपर्यंत आहे. मेट्रो सहा आणि नऊचे काम प्रगतिपथावर आहे. मेट्रो १० चा डीपीआर झाला आहे. हा प्रकल्प गायमुखपासून शिवाजी चौकपर्यंत आहे. या प्रकल्पाच्या बाकीच्या परवानग्या घेण्याचे काम सुरू आहे. मेट्रो १२ लाइन ही कल्याण ते तळोजा अशी आहे. यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.

 ठाणे कोस्टल रोडचा विचार करता हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक झाली आहे. टोपोग्राफी सर्व्हे सुरू आहे. हा प्रकल्प गायमुखपासून खारेगावपर्यंत आहे. प्रकल्पामुळे अवजड वाहने थेट जेएनपीटीकडे जातील. त्यामुळे लगतच्या रस्त्यावरील ताण कमी होईल. 

 स्वामी समर्थनगर या मेट्रोमुळे मुंबईचे पूर्व आणि पश्चिम उपनगर जोडले जाईल. पूर्व आणि पश्चिम असा प्रवास करायचा झाल्यास रोडशिवाय पर्याय नाही. मेट्रोमुळे हा प्रवास सुखकर होईल. दहिसर ते मीरा भाईंदर या प्रकल्पामुळे नागरिकांचा वेळ वाचेल. आता दहिसरपर्यंत एक मेट्रो धावत आहे. त्यात आणखी भर पडणार आहे.

 कल्याण रिंग रूटचा विचार करता हा प्रकल्प कल्याण- डोंबिवलीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. घाटकोपर ते ठाण्यापर्यंतच्या पूर्व मुक्तमार्ग प्रकल्पअंतर्गत उन्नत मार्गामुळे वाहतूककोंडी कमी होईल. मुंबईला विकेंद्रीत करत मुंबईत कामासाठी बाहेरून येणाऱ्या लोकांना ते जेथे आहेत तेथेच सेवा सुविधा दिल्या तर मुंबईवर येणारा ताण कमी होईल. हा सगळा विचार करूनच हे प्रकल्प राबविण्यात आले आहेत.

टॅग्स :मेट्रो