मराठी विज्ञान परिषदेतर्फे डॉ. प्रियंका खोलेंना पुरस्कार

By सचिन लुंगसे | Published: October 20, 2022 09:53 PM2022-10-20T21:53:18+5:302022-10-20T21:53:44+5:30

यंदाचा हा पुरस्कार डॉ. प्रियंका खोले यांना जाहीर झाला असून, त्या पहिल्या महिला मानकरी आहेत.

By Marathi Science Parishad Dr. Award to Priyanka Pahana | मराठी विज्ञान परिषदेतर्फे डॉ. प्रियंका खोलेंना पुरस्कार

मराठी विज्ञान परिषदेतर्फे डॉ. प्रियंका खोलेंना पुरस्कार

googlenewsNext

मुंबई : मराठी विज्ञान परिषदेतर्फे लोकोपयोगी संशोधन करणाऱ्या तसेच ४० वर्षाखालील अभियंत्याला मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार (रुपये दहा हजार व प्रमाणपत्र) २०१८ पासून देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार डॉ. प्रियंका खोले यांना जाहीर झाला असून, त्या पहिल्या महिला मानकरी आहेत.

कृषिअभियंता असलेल्या डॉ. प्रियंका यांनी प्रत्यक्ष शेता-शेतावर जाऊन अडचणींचे निरीक्षण केले. जमिनीखाली येणा-या (भुईमूगाच्या शेंगा, लसूण इत्यादी) पिकांना बाहेर काढण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची अडचण लक्षात घेऊन, त्यांनी प्रचलित उपकरणांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे शेतक-यांचा अडचणी दूर झाल्या असून याविषयी डॉ. प्रियंका यांचे काही शोध-निबंधही प्रसिद्ध झाले आहेत. यावर्षी या पुरस्कारासाठी नांदेड, धुळे, कोल्हापूर, मुंबई या ठिकाणाहून प्रवेशिका आल्या होत्या.
 

Web Title: By Marathi Science Parishad Dr. Award to Priyanka Pahana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई