Join us

कांदिवलीच्या पोटनिवडणुकीत भाजपाची सरशी, प्रतिभा गिरकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 4:40 PM

ज्येष्ठ नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्र. 21 येथे आज झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या सून प्रतिभा गिरकर विजयी झाल्या आहेत

ठळक मुद्देप्रभाग क्र. 21 येथे झालेल्या पोटनिवडणुकीत प्रतिभा गिरकर विजयी ज्येष्ठ नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती जागाया प्रभागात गिरकर यांच्या समर्थनार्थ काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही राजकीय पक्षांनी उमेदवार उभा केला नव्हता

मुंबई - ज्येष्ठ नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्र. 21 येथे आज झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या सून प्रतिभा गिरकर विजयी झाल्या आहेत. या प्रभागात गिरकर यांच्या समर्थनार्थ काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही राजकीय पक्षांनी उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे एकतर्फी ठरलेल्या या लढतीत ७१२२ मते मिळवून गिरकर विजयी ठरल्या. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार नीलम मधाले (मकवाणा) यांचा पराभव केला. या विजयामुळे भाजपाच्या नगरसेवकांची संख्या आता ८३ झाली आहे.

कांदिवली येथील या प्रभागात गिरकर यांची लोकप्रियता अधिक असल्याने भाजपाने त्यांच्या सून प्रतिभा गिरकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. या पोटनिवडणूकीत शिवसेनेने भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी भाजप आमदार भाई गिरकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. गिरकर परिवाराचे आणि शिवसेनेचे जुने संबंध असल्यामुळे शिवसेनेने या पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षानेही उमेदवार न दिल्याने भाजपचा विजय निश्चित झाला होता.

या पोटनिवडणुकीत  केवळ २८.७५ टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत सहा हजार ६३१ पुरूष व पाच हजार १७३ महिला असे एकूण ११ हजार ८०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदानाची मोजणी आज करण्यात आली. यात प्रतिभा गिरकर यांच्या पारड्यात ९५९१ मते तर काँग्रेसच्या निलम मधाळे (मकवाणा)यांना १९८४ मते पडली. यामुळे गिरकर यांना विजयी घोषित करण्यात आले. 

टॅग्स :भाजपामुंबई महानगरपालिका