Join us

सी-लिंक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १०० टक्के फास्टॅग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 5:25 AM

एमएसआरडीसीने ११ जानेवारीपासून सागरी सेतू व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार, जीप व एसयूव्ही फास्टॅग वाहनधारकांना प्रत्येक फेरीला पाच टक्के कॅशबॅक देण्यात सुरुवात केली.

मुंबई : वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतू आणि यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल नाक्यांवरील सर्व मार्गिकांवर २६ जानेवारीपासून फास्टॅग प्रणालीची १०० टक्के अंमलबजावणी होईल.

एमएसआरडीसीने ११ जानेवारीपासून सागरी सेतू व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार, जीप व एसयूव्ही फास्टॅग वाहनधारकांना प्रत्येक फेरीला पाच टक्के कॅशबॅक देण्यात सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मि‌ळाला. २६ जानेवारीपासून वांद्रे-वरळी सागरी सेतू व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सर्व मार्गिकांवर फास्टॅग प्रणालीने असेल. काही लेन मर्यादित कालावधीसाठी हायब्रीड लेन असतील. तेथे फास्टॅग नसलेले वाहनधारक रोख रक्कम भरू शकतात. पण टोल नाक्याजवळील स्टॉलवरून फास्टॅग विकत घेऊन गाडीवर लावावा लागेल, असे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे म्हणाले. फास्टॅग मार्गिकेत विनाफास्टॅग, ब्लॅकलिस्टेड टॅग असलेल्या वाहनांनी प्रवेश केल्यास दुप्पट टोल भरावा लागेल.

टॅग्स :टोलनाकामहामार्ग