आजपासून सी-लिंकचा टोल वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:06 AM2021-04-01T04:06:35+5:302021-04-01T04:06:35+5:30

नवे दर पुढील तीन वर्षांसाठी लागू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंक म्हणजेच राजीव गांधी सागरी सेतू ...

C-Link's toll has increased from today | आजपासून सी-लिंकचा टोल वाढला

आजपासून सी-लिंकचा टोल वाढला

Next

नवे दर पुढील तीन वर्षांसाठी लागू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंक म्हणजेच राजीव गांधी सागरी सेतू प्रकल्पाचे सुधारित पथकर वसुलीचे दर १ एप्रिलपासून अंमलात येणार आहेत. त्यामुळे टाेल १५ ते ३० रुपयांनी वाढला असून त्यानुसार, आता वाहन चालकांना ८५, १३० आणि १७५ रुपये एवढा टोल प्रतिफेरी भरावा लागेल. पुढील ३ वर्षांसाठी हा नवा दर लागू राहील.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित्यात राजीव गांधी सागरी सेतू येतो. येथून प्रवास करताना आता १ एप्रिलपासून येथे सुधारित पथकर वसुलीचे दर लागू होत आहेत. त्यानुसार, कार, जीप जसे की टाटा सुमो, ट्रॅक्स, कमांडर इतर तत्सम वाहने (चालक वगळून १२ प्रवासी क्षमता असलेली), वाहनचालक वगळून सहा आसनी प्रवासी रिक्षांसाठी ८५ रुपये प्रतिफेरीसाठी मोजावे लागतील.

मिनी बस किंवा तत्सम वाहने (चालकवगळून १२ पेक्षा जास्त पण २० प्रवासी क्षमतेपर्यंत) आणि मालवाहतूक करणारी वाहने यांना १३० रुपये मोजावे लागतील तर ट्रक आणि बस या वाहनांसाठी प्रतिफेरीसाठी १७५ रुपये आकारले जातील.

----------

जुने दर - नवे दर (रुपयांत )

७० - ८५

११० - १३०

१४५ - १७५

Web Title: C-Link's toll has increased from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.