राज्यातील सीए परीक्षार्थींना पुन्हा संधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:05 AM2021-07-26T04:05:38+5:302021-07-26T04:05:38+5:30
मुंबई : देशातील सर्व राज्यात २४ जुलैपासून सीए फाउंडेशन कोर्स जून-जुलै २०२१ची परीक्षा घेतली जात आहे. राज्यातील कोल्हापूर, सातारा, ...
मुंबई : देशातील सर्व राज्यात २४ जुलैपासून सीए फाउंडेशन कोर्स जून-जुलै २०२१ची परीक्षा घेतली जात आहे. राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, इचलकरंजी या जिल्ह्यांत पूरपरिस्थितीमुळे २४ जुलै रोजी सीए फाउंडेशन पेपर १ प्रिन्सिपल ॲॅण्ड प्रॅक्टिसेस ऑफ अकाउण्टिंग न देऊ शकलेल्या किंवा या परिस्थितीत परीक्षा केंद्रावर पोहचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी पुन्हा एक संधी देण्यात येणार आहे. याबाबत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउण्टट्स ऑफ इंडियाने अधिकृत पत्रक जारी केले आहे.
या परीक्षांच्या पुन्हा संधी देण्याबाबत संकेतस्थळवर सूचना देण्यात येईल, असे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउण्टट्स ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. यामुळे संभ्रमात असणाऱ्या विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळणार आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउण्टट्स ऑफ इंडियाने ५ जुलै रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे दि. २४, २६, २८ आणि ३० जुलै रोजी सीए फाउंडेशन कोर्स अभ्यासक्रमाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.