सीए, एसवायबीकॉमचा पेपर एकाच दिवशी; विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 03:20 AM2018-10-07T03:20:49+5:302018-10-07T03:21:35+5:30
एसवायबीकॉम आणि सीएची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांनी तारीख बदलण्याची मागणी केली होती. वेळापत्रकातील गोंधळ लक्षात आल्यावर विद्यापीठाकडून एसवायबीकॉमचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.
मुंबई : एसवायबीकॉम आणि सीएची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांनी तारीख बदलण्याची मागणी केली होती. वेळापत्रकातील गोंधळ लक्षात आल्यावर विद्यापीठाकडून एसवायबीकॉमचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. सदर बदलासंबंधी मुंबई विद्यापीठाकडून पत्रक जारी करण्यात आले असून, सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनाही कळविण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून २४ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार एसवायबीकॉमचा पेपर २ नोव्हेंबर २०१८ रोजी आहे, तर दुसरीकडे चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट आॅफ इंडियातर्फे घेण्यात येणाºया सीए परीक्षेचा पार्ट १ चा पेपरही त्याच दिवशी आहे. अनेक विद्यार्थी या दोन्ही परीक्षा देत असल्याने वेळापत्रक पाहताच ते तणावात आले. त्यांनी विद्यापीठाने या दिवशीचा पेपर पुढे ढकलण्याची मागणी केली. मुंबई विद्यापीठाला टॅग करत, सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी या संबंधित टिष्ट्वट केले होते. त्यानुसार, विद्यापीठाने आता एसवायबीकॉमचा पेपर एक दिवस पुढे ढकलला असून, तो आता ३ नोव्हेंबरला होईल.