नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, 26 जानेवारीपासून होणार अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 02:14 PM2020-01-22T14:14:45+5:302020-01-22T16:12:58+5:30
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून, 26 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. पब आणि बारसाठी नवे नियम नाहीत, पूर्वीप्रमाणेच दीड वाजेपर्यंतची मर्यादा कायम राहणार असल्याचंही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. दिवाळी आणि गणपतीच्या सणांच्या वेळी आपण रात्रभर फिरत असतो. नाइटलाइफ सुरू केल्यानं अनेक जण तीन शिफ्टमध्ये काम करतील.
महसुलाबरोबरच नोकऱ्यांमध्येही वाढ होणार आहे. आतापर्यंत पोलीसवाले दीड वाजेपर्यंत दुकानं खुली आहेत की बंद याचा आढावा घेत फिरत होते. त्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करायचं असून, त्यांना खरं पोलिसांचं काम करायला देणार आहे. जर कोणत्याही मॉल किंवा कंपनीला वाटलं खासगी सुरक्षा द्यावी, तर तीसुद्धा आम्ही पुरवणार आहोत. उत्पादन शुल्काचे कायदे बदललेले नाहीत. सर्व अभ्यास करूनच हा प्रस्ताव मांडला असून, तो कार्यान्वित होणार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Maharashtra Minister Aaditya Thackeray: Proposal of Mumbai 24x7 has been approved by Cabinet today. From 27th January malls, multiplexes,shops&eateries in non-residential areas like Bandra Kurla Complex&Nariman Point will remain open 24x7. However, we won't impose this on anyone. pic.twitter.com/Hw6QRJbzWb
— ANI (@ANI) January 22, 2020
नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होणार असून, या भागातील मॉल, दुकाने, हॉटेल्स 24 तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नाइटलाइफसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार असून, उपक्रमाचे यश पाहून व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या उपक्रमात आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे 24 तास मुंबईकरांना सेवा-सुविधा मिळणार असल्याने उद्योग-रोजगार वाढेल. रात्रभर कामानिमित्त घराबाहेर असणा-यांची सोय होईल. त्यामुळे नाइटलाइफ फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मनोरंजनासोबत रोजगारनिर्मिती करणे, पर्यटन वाढविणे हा नाइटलाइफ सुरू करण्याचा उद्देश आहे. मात्र व्यवसायातील फायद्याच्या दृष्टीने आठवडाभर 24 तास दुकाने, मॉल आदी खुले ठेवायचे की नाही, हा निर्णय त्यांच्या मालकांवर अवलंबून असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड
...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना
ई-तिकिटाच्या काळाबाजारातून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय; RPFचा पर्दाफाश
बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला
उद्धवा, अजब तुझे सरकार म्हणत मनसे नेत्याने ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाची उडवली खिल्ली