Join us

'मंत्रिमंडळ विस्ताराला एक वर्ष लागेल अशी अपेक्षा नव्हती'; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 2:21 PM

राज्यात शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण करत आहे.

मुंबई-  राज्यात शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण करत आहे. मागील वर्षी शिवसेनेत उभी फूड पडल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेतील ४० आमदरांसह प्रहारच्या बच्चू कडू यांनीही बंडखोरी केली होती. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची नेहमी चर्चा होते. विस्तारावरुन आरोप-प्रत्यारोपही झाले. आता आमदार बच्चू कडू यांनीही सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मुंबईत पोलिसांच्या नोटीस धडकल्या! शाखाप्रमुख, माजी नगरसेवक गद्दार दिन साजरा करणार का? 

आमदार बच्चू कडू म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल असेल असं वाटतं होतं. दुसऱ्या फेरीत मंत्रिमंडळात निवड होईल असं वाटतं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराल वर्ष लागेल असं वाटतं नव्हत. विस्तार झाला नाही म्हणून नाराज नाही. सरकारने काही कामे चांगली केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तरी मी नाराज नाही. आता मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटतं नाही, पुढचा विस्तार हा २०२४ मध्ये होईल ती क्षमता या सरकारमध्ये नाही, असा घरचा आहेर बच्चू कडू यांनी दिला आहे.   

गेल्या वर्षी राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेतील ४० आमदारांसह अपक्ष आमदारांनी बंड केले. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजिनामा दिला. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. मुख्यमंत्रिपदाची एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्रिपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. दरम्यान, काही दिवसातच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जात होते, पण अजुनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.  

टॅग्स :बच्चू कडूएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस