मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 02:21 PM2019-07-09T14:21:58+5:302019-07-09T14:22:03+5:30
नक्षलग्रस्त, अल्पसंख्यांक, दुष्काळसंदर्भात विविध निर्णय घेण्यात आले आहेत.
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची नियमित बैठक मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नक्षलग्रस्त, अल्पसंख्यांक, दुष्काळसंदर्भ यांसह विविध निर्णय घेण्यात आले आहेत.
आजच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
1. राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू.
2. सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय झालेली जमिनींची हस्तांतरणे नियमानुकूल करण्यासाठी इनाम किंवा वतन विषयक प्रमुख कायद्यांत सुधारणा करण्यास मान्यता.
3. राज्याच्या बंदर विकास धोरण-2016 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यामध्ये विविध सुधारणा करण्यास मंजुरी.
4. सार्वजनिक हितासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) हस्तांतरित होणाऱ्या जमिनींचे मुद्रांक शुल्क माफ.
5. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व गुहागर या दोन तालुक्यांसाठी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना चिपळूण येथे करण्याचा निर्णय.
6. जळगाव जिल्ह्यातील निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधित मागासवर्गीय कुटुंबांना विशेष बाब म्हणून संपादित घराच्या किंमतीऐवढी नुकसान भरपाई देणार.
7. अल्पसंख्याक समुदायातील महिलांना बचतगटांची स्थापना करुन कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याच्या योजनेस मान्यता.