Cabinet Decisions: पोलिसांसाठी आनंदाची बातमी; शिंदे - फडणवीस सरकारचे महत्त्वाचे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 01:50 PM2022-09-21T13:50:58+5:302022-09-21T15:14:10+5:30
शिंदे-फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक झाली.
मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाहा मंत्रिमंडळ संक्षिप्त निर्णय:
उच्च व तंत्रशिक्षण-
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार.
पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाज २८ सप्टेंबरपासून प्रारंभ
वित्त विभाग-
राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करणार. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण
गृह विभाग-
पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवल्या
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-
सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती
शालेय शिक्षण विभाग-
नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा
परिवहन विभाग-
वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देणार. सुधारित खर्चास आणि राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.
पणन विभाग-
बार्शी येथील लक्ष्मी सोपान अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खाजगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश
विधी व न्याय-
औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करणार
सामान्य प्रशासन विभाग-
राज्यातील वर्ग ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे एम.पी.एस.सी. मार्फत भरणार
मदत व पुनर्वसन-
आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना
गृहनिर्माण विभाग-
धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता