Join us

Cabinet Decisions: पोलिसांसाठी आनंदाची बातमी; शिंदे - फडणवीस सरकारचे महत्त्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 1:50 PM

शिंदे-फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक झाली.

मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पाहा मंत्रिमंडळ संक्षिप्त निर्णय:

उच्च व तंत्रशिक्षण- 

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार.

पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाज २८ सप्टेंबरपासून प्रारंभ

वित्त विभाग-

राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करणार. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण

गृह विभाग-

पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ पासून २० इतक्या वाढवल्या 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-

सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती

शालेय शिक्षण विभाग-

नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडे तत्त्वावर जागा 

परिवहन विभाग-

वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देणार. सुधारित खर्चास आणि  राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.

पणन विभाग- 

बार्शी येथील लक्ष्मी सोपान अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खाजगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश

विधी व न्याय-

औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करणार

सामान्य प्रशासन विभाग-

राज्यातील वर्ग ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे एम.पी.एस.सी. मार्फत भरणार

मदत व पुनर्वसन- 

आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

गृहनिर्माण विभाग-

धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मान्यता

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकार