Video: झोपडपट्टीतील घरी जाऊन कॅबिनेटमंत्र्यांनी केला अक्षयच्या आई-वडिलांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:24 PM2020-06-23T12:24:17+5:302020-06-23T12:25:35+5:30

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय गडलिंगने स्पर्धा परीक्षेतून अुतलनीय यश मिळवले आहे. अक्षयचे वडील गेल्या कित्येक वर्षांपासून गावोगावी सायकलने फिरून भंगार खेरेदी करतात

Cabinet Minister felicitates Akshay's parents by visiting Chandramoli slum tiwasa | Video: झोपडपट्टीतील घरी जाऊन कॅबिनेटमंत्र्यांनी केला अक्षयच्या आई-वडिलांचा सन्मान

Video: झोपडपट्टीतील घरी जाऊन कॅबिनेटमंत्र्यांनी केला अक्षयच्या आई-वडिलांचा सन्मान

Next

मुंबई - अमरावती तालक्याच्या तिवसा येथील अक्षय गडलिंगने स्पर्धा परीक्षेत यश मिळवत नायब तहसिलदारपदाला गवसणी घातली. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं. घरात अठरा विश्व दारिद्र असतानाही, अक्षयने परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले आहे. त्यामुळे, जिल्ह्यासह महाराष्ट्रातून अक्षयचं आणि त्याच्या आई-वडिलांचं कौतुक होत आहे. याबाबतचे वृत्त लोकमत ऑनलाईने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर, अमरावतीच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी घरी जाऊन अक्षय व त्याच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले. 

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय गडलिंगने स्पर्धा परीक्षेतून अुतलनीय यश मिळवले आहे. अक्षयचे वडील गेल्या कित्येक वर्षांपासून गावोगावी सायकलने फिरून भंगार खेरेदी करतात आणि त्याबदल्यात रांगोळी विकण्याचा व्यवसाय करतात. मात्र, आपल्या नशिबी जे कष्ट आणि पीडा आली ती मुलाच्या येऊ नये, या भावनेतून त्यांनी मुलगा अक्षयला शिक्षण देण्यासाठी अपार कष्ट घेतले. आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेऊन अक्षयनेही मोठ्या जिद्दीने राज्यसेवा परीक्षेतून विजयश्री खेचून आणली. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असल्याने भविष्यात त्याने मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी त्याने प्रयत्नांची परिकाष्ठा केली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अक्षय महागडे शिकवणी वर्ग लावू शकत नव्हता. त्यामुळे त्याने विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शिकवणी वर्गात प्रवेश घेतला. त्याने दिल्ली येथील शिकवणी वर्गात तसेच तिवस्यातील राजश्री शाहू महाराज वाचनालयात तासनतास बसून अभ्यासाचे धडे गिरवले. गेल्यावेळी तहसीलदार पदासाठी तीन गुणांनी नापास झालेला अक्षय खचून न जाता पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागला आणि त्याने यश मिळविले.

अक्षयच्या जिद्दीची आणि त्याच्या आई-वडिलांच्या अपार कष्टाची कहाणी स्पर्धा परीक्षांच्या निकालानंतर माध्यमांत झळकली. त्यानंतर, अक्षयवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शेजारी-पाजारी, नातेवाई आणि जिल्ह्यातून अक्षयचे अभिनंदन होत आहे. आता, अमरावतीच्या पालकमंत्री आणि कॅबिनेटमंत्री यशोमती ठाकूर यांनी अक्षय राहत असलेल्या चंद्रमोळी या झोपडपट्टीत जाऊन त्याच्या आई-वडिलांचा सत्काम केला. तसेच, अक्षयचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. चक्क कॅबिनेटमंत्र्यांनी झोपडपट्टीतील घरी येऊन सत्कार केल्यामुळे अक्षयचे आई-वडिल भारावून गेले होते. यशोमती ठाकूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

दरम्यान , अक्षय त्याला मिळालेल्या या यशाचे सर्व श्रेय आईवडिलांना, मित्रांना आणि शिक्षकांना देतो. अक्षयचे 'माझे बाबा हे ९ वी वर्ग पास तर आई ४ थी शिकलेली आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने वडील भंगार, रद्दी गोळा करण्याचा व्यवसाय करताना तर आई मोलमजुरी करते. असे असूनही त्यांनी गरिबीची झळ मला कधीच पोहचू दिली नाही. त्यामुळे, माझे हे यश माझ्यापेक्षा माझ्या आई-वडिलांच्या कष्टाचं पांग फेडणारं आहे. मी सरकारच्या सर्व योजनांचा फायदा माझ्या अभ्यासासाठी घेतल्याचेही अक्षयने सांगितले. आई-वडिलांनी दिलेलं पाठबळ, मित्र व शिक्षकांची साथ आणि सरकारी योजनांचा फायदा घेऊन मी स्वत:ला अभ्यासात झोकून दिलं. उपजिल्हाधिरी आणि तहसिलदार पदाची पोस्ट अतिशय कमी मार्काने मी हुकलो. पण, नायब तहसिलदार हेही नसे थोडके असे म्हणत आई-वडिलांनी मला समजावून सांगत धीर दिला, असेही अक्षय म्हणाला.  


 

Web Title: Cabinet Minister felicitates Akshay's parents by visiting Chandramoli slum tiwasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.